शुक्रवारी मनपाकडून ३६ हजार दंड वसूल
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:24+5:302020-11-28T04:16:24+5:30
रस्त्यावर थुंकणे १२०० रूपये, विना मास्क फिरणारे एकूण ६९ व्यक्तींकडून ५०० रुपये प्रमाणे ३४ हजार ५००, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या ...

शुक्रवारी मनपाकडून ३६ हजार दंड वसूल
रस्त्यावर थुंकणे १२०० रूपये, विना मास्क फिरणारे एकूण ६९ व्यक्तींकडून ५०० रुपये प्रमाणे ३४ हजार ५००, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या ७ नागरिकांकडून १ हजार ५०, छावणी येथील महंमद इब्राहिम महंमद फारुख प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांना विकताना नागरी मित्र पथकातील कर्मचारी यांच्या नजरेस पडला. त्याच्याकडून अंदाजे १० हजार रुपये किमतीच्या अंदाजे ३ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून छावणी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी नागरी मित्र
पथकासोबत कॅनॉट परिसर येथे पायी फिरून तेथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्याबद्दल समजावून सांगितले व दंडही वसूल केला.