३६ जणांचा सेंद्रिय शेतीचा संकल्प
By Admin | Updated: July 28, 2014 01:00 IST2014-07-27T23:31:48+5:302014-07-28T01:00:56+5:30
भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.

३६ जणांचा सेंद्रिय शेतीचा संकल्प
भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.
हिंगोली तालुक्यातीज साटंबा येथे अफार्म पुणे व जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी पी.डी.शिंदे, डी.एस.डाखोरे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले.
रासायनिक खते वापरून पिकवलेल्या धान्यातून माणसाच्या पोटात एक प्रकारचे विष जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची असलेल्या सेंद्रिय शेतीच्या उत्तम पर्यायाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच संजीवनी घ्यार, रामचंद्र घ्यार, मारोतराव घ्यार, राम घ्यार, अनिल तपासे यांची उपस्थिती होती.
अशाच प्रकारे जामठी खु. गावातही बैठक घेण्यात आली. यावेळी प्रल्हादराव भवर, बंडू कऱ्हाळे, उत्तमराव कऱ्हाळे, भिकाजीराव भवर, उपसरपंच माधव भवर, कौतिकराव भवर, प्रकल्प अधिकारी दत्तराव भवर, संतोष भवर, संजय भवर, नामदेव घ्यार, भागवत घ्यार, समाधान टापरे, बालाजी घ्यार आदी उपस्थित होते. साटंबा येथील २५ तर जामठी खु. येथील ११ शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला असून त्याबाबतची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे कृषिदूत पी.डी.शिंदे देणार आहेत. हा कार्यक्रम निवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. या भागातील अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीची कास धरत आहेत. (वार्ताहर)