शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’ला ३५०० विद्यार्थ्यांची दांडी

By admin | Updated: September 29, 2014 01:00 IST

औरंगाबाद : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रविवारी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) कसलाही गोंधळ न होता सुरळीत पार पडली.

औरंगाबाद : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रविवारी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) कसलाही गोंधळ न होता सुरळीत पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शहरातील १७ केंद्रांवर ‘पेट’साठी परीक्षार्थींची आसन व्यवस्था केलेली होती. एकूण ५३ विषयांसाठी ९ हजार २३० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी आज प्रत्यक्षात ५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तब्बल ४० टक्के (३,४११) विद्यार्थी अनुपस्थित होते.सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान ‘पेट’चा पहिला पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य होता. दुपारी २.३० ते ४.३० वाजेदरम्यान संबंधित विषयांचे पेपर झाले. परीक्षेच्या सर्व केंद्रांवर कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, समन्वयक डॉ. माधव सोनटक्के, डॉ. सचिन देशमुख यांनी भेट दिली. परीक्षेसाठी विद्यापीठाने २० निरीक्षकांची नेमणूक केलेली होती. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, दोन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका घेतल्यानंतर त्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली. विद्यापीठाने ‘ओएमआर’पद्धतीच्या उत्तरपत्रिका वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ कार्बन कॉपी देणे शक्य झाले.उद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर या परीक्षेची ‘अन्सर की’ टाकली जाईल. त्यामुळे लगेच विद्यार्थ्यांना आपणास किती गुण मिळतील हे समजेल. येत्या ५ दिवसांच्या आत या परीक्षेचा निकाल जाहीर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.