पर्ल्समध्ये लातूरकरांचे ३५० कोटी ?

By Admin | Updated: November 7, 2014 00:42 IST2014-11-07T00:33:33+5:302014-11-07T00:42:34+5:30

चेतन धनुरे/बाळासाहेब जाधव ल्ल उदगीर/लातूर चेन मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उभी करणाऱ्या पर्ल्स या कंपनीकडून परतावा मिळणे थांबल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़

350 million of the people in Perl? | पर्ल्समध्ये लातूरकरांचे ३५० कोटी ?

पर्ल्समध्ये लातूरकरांचे ३५० कोटी ?


चेतन धनुरे/बाळासाहेब जाधव ल्ल उदगीर/लातूर
चेन मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उभी करणाऱ्या पर्ल्स या कंपनीकडून परतावा मिळणे थांबल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ लातूर जिल्ह्यातून साडेतीनशे कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाल्याचे पुढे आले आहे. सेबीच्या कारवाईनंतर आलेल्या वृत्तांमुळे जिल्हाभरातील गुंतवणूकदार हादरले आहेत. त्यांनी एजंटकडे पैशाचा तगादा लावल्याने एजंट चांगलेच हैराण झाले आहेत.
गेल्या सोळा वर्षांपूर्वीपासून लातूर, औसा, चाकूर, रेणापूर, निलंगा उदगीर व देवणी भागात पर्ल्सची चेन मार्केटिंग सुरु झाली़ याच भागातील काही लोकांनी सुरुवातीला एजंटांचे जाळे विणत मोठमोठ्या परताव्याचा दावा करुन गुंतवणूकदारांचा ओढा पर्ल्सकडे वळविला़ वेगवेगळ्या आकर्षक योजनांद्वारे नागरिकांना या एजंटांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक करायला लावली़ बघता-बघता या भागातील एजंटांची संख्या संख्या हजारावर गेली आहे़ त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्याही वाढून कोट्यवधी रुपये कंपनीत गुंतविले गेले आहेत़ देवणी तालुक्यातील विजयनगर व दवणहिप्परगा येथील मुख्य एजंटांनी त्यांच्याखाली लहान एजंट तयार केले आहेत़ या एजंटांची संख्या हजारावर असल्याची माहिती मिळाली आहे़ विजयनगरचे बोरुळे व दवणहिप्परग्याचे राम टिळे हे या भागातील समुपदेशक आहेत़ त्यांनी चेन वाढवून एजंटांद्वारे कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणली़ नजिकच्या काळापर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळत गेला़ मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा परतावा मिळणे थांबले आहे़ गुंतवणूकदारांमध्ये राजकीय नेत्यांपासून शिक्षक, नोकरदार, कर्मचारी, मजूरदार, शेतकरी, महिला असा प्रत्येक घटक समाविष्ट आहे़
लातूर जिल्ह्यात पर्ल्स एजंटांची संख्या मोठी आहे़ महिन्याला ५० हजाराचा भरणा करणाऱ्या एजंटांना चार टक्के कमिशन आहे. ५० हजार जमा करणाऱ्याच्या खिशात २ हजार रुपये जात होते़ त्यामुळे एजंट अधिकाधिक पैसे गोळा करण्यासाठी दिवसारात्र काम करायचे विशेष यामध्ये गुंतवणूक वाढत जाईल तसा एजंटाचाही दर्जा वाढत जायचा़ एजंटाचा फिल्ड आॅफिसर, त्यानंतर आॅर्गनायझर असे प्रमोशनही देण्यात येत असल्याने एजंटाच्या संखेत मोठी वाढ झाली़ परिणामी त्यांनी आपल्या नातेवाईकासह मित्रांनाही गुंतवणूक करण्यात भाग पाडले़ परंतु आजच्या परिस्थित त्या कंपनीची चौकशी होत एसआयटी मार्फत चौकशी होत असल्याने गुंतवणूकदाराबरोबरच एजंटही अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्यात या संस्थेचे २० हजारांहून अधिक एजंट आहेत. त्यात ग्रामीण भागातील महिलांचा मोठा समावेश आहे. सेबीच्या कारवाईच्या बातम्या येताच या साऱ्या एजंटांच्या मागे गुंतवणूकदारांनी तगादा लावला आहे. हा इतका भयानक आहे की अनेक एजंटांनी आपले भ्रमणध्वनी स्विच आॅफ केले आहेत. त्यामुळे गैरसमजात आणखी भर पडत असून गुंतवणूकदार त्यांच्या दारावर लोंढ्याने जात आहेत.
शेजमजुरांनीही गुंतविले पैसे
४गुंतवणुकीच्या आमिषाने चाकूर तालुक्यातील अलगरवाडी या चाकूर तालुक्यातील दोन अडीचशे कुटुंबाच्या गावात ९० टक्के पल्समध्ये पैसे गुंतविलेले लोक आहेत. या गावातील करुबाई केंगार ही मोजमजुरी करणारी महिला पैसे बुडणार की काय विचाराने अस्वस्थ आहे. अशीच अवस्था सखुबाई गेडमे या हातावर पोट असलेल्या महिलेची झाली आहे.
कंपनीची सेबी व सीबीआयकडून चौकशी सुरु असल्याने खाते गोठविण्यात आले आहेत़ त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येत नसल्याने तूर्तास परतावा थांबला आहे़ चौकशी समितीने परवानगी दिल्यास त्वरीत परतावा मिळणार आहे़ गुंतवणूकदारांच्या रकमेच्या सहापट मालमत्ता कंपनीकडे असल्याचा दावा करुन प्रत्येक गुंतवणूकदाराची रक्कम परत मिळेल, असे स्पष्टीकरण समुपदेशक राम टिळे, एजंट बालाजी वळसांगवीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले़
याबाबत आदर्श मैत्री फौंडेशनचे संतोष बिराजदार यांनी गुंतवणूकदारांचे संघटन करुन प्रत्येकाचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कोणतेही शुल्क न भरता गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन संघटीतपणे लढा दिल्यास गुंतविलेले पैसे आणण्यासाठी रचनात्मक लढाईसाठी एकत्रे यावे, असे आवाहनही संतोष बिराजदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
उदगीर तालुक्यातील कुमठा बु़ येथील रहिवासी असलेले श्रीरंग तलवारे हे रेल्वे खात्यात नोकरीस होते़ ते काही वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले आहेत़ त्यांना मिळालेल्या पेन्शनच्या रकमेपैकी २ लाख ५० हजार रुपये त्यांनी पर्ल्समध्ये गुंतविले़ मात्र आता परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना एजंटाकडे खेटे मारावे लागत आहेत़ वृद्धत्वातील आधारच अडकला असल्याची प्रतिक्रिया त्यांचे जावई राजकुमार कांबळे यांनी दिली़ एकुर्का येथील चालक ज्ञानोबा जाधव यांनीही १ लाख रुपये गुंतविले आहेत़

Web Title: 350 million of the people in Perl?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.