३५० हेक्टरवरील तुरीला फुलेच!

By Admin | Updated: December 31, 2016 23:37 IST2016-12-31T23:36:28+5:302016-12-31T23:37:17+5:30

औसा तुरीच्या आयसीपीएच २७४० या नव्या वाणाची लागवड केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळते, असे सांगून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाणाचे तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांना मोफत वाटप केले़

350 hectares of flowers! | ३५० हेक्टरवरील तुरीला फुलेच!

३५० हेक्टरवरील तुरीला फुलेच!

रमेश शिंदे औसा
तुरीच्या आयसीपीएच २७४० या नव्या वाणाची लागवड केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळते, असे सांगून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाणाचे तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांना मोफत वाटप केले़ हे पीक आता काढणीला आले असून केवळ फुलेच लगडली आहेत़ शेंगाचे प्रमाण मात्र फारच अत्यल्प आहे़ त्यामुळे ३५० हेक्टरवर तुरीचा खराटाच दिसत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़
तालुक्यात खरीपाचे पेरणीयोग्य क्षेत्र ९५ हजार हेक्टर क्षेत्र असून तुरीचे क्षेत्र २७ हजार २१६ हेक्टर आहे़ यंदा चांगला पाऊस झाल्याने चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती़ दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुरीचे चांगले उत्पन्न देणारे आयसीपीएच २७४० हे वाण विकसित झाल्याचे सांगून त्याचे शेतकऱ्यांना मोफत वाटप केले़ ६०० शेतकऱ्यांनी हे तुरीचे वाण घेऊन पेरा केला़ त्यातील काही शेतकऱ्यांनी गादी वापे तयार करुन लागवड केली़ त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या तुरीचे क्षेत्र ३५० हेक्टर आहे़
या नव्या वाणाच्या तुरीच्या रोपांची शेतकऱ्यांनी चांगली जोपासना केली़ काहींनी तर ठिबक सिंचनचा वापर केला़ हे पीक बहरल्याने शेतकरी आनंदी झाले आणि यंदा चांगले उत्पन्न मिळणार अशी आशा बाळगून होते़ परंतु, ही तूर लागवड करुन सहा महिने उलटले असून तूर पीक काढणीस आले आहे़ मात्र, या वाणाच्या तुरीच्या पिकांस केवळ फुलेच लागली आहेत़ या फुलांची गळतीही मोठ्या प्रमाणात होऊन अत्यल्प प्रमाणात शेंगा लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ या वाणाचा तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे़
नागरसोगा, बोरफळ, लिंबाळा (दाऊ), बानेगाव, भादा यासह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी तुरीचे आयसीपीएच २७४० हे वाण बोगस आहे़ सहा महिने उलटले तरी शेंगा लागत नाहीत़ या पिकासाठी आतापर्यंत खुरपणी, फवारणीसाठी एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च झाला आहे़

Web Title: 350 hectares of flowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.