३५ गावांचे मूल्यमापन
By Admin | Updated: August 19, 2014 02:07 IST2014-08-19T01:20:23+5:302014-08-19T02:07:39+5:30
हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या व जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरलेल्या ३५ गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीकडून १७ आॅगस्ट

३५ गावांचे मूल्यमापन
हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या व जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरलेल्या ३५ गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीकडून १७ आॅगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन व अंबडच्या समितीने हिंगोली जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या.
भोकरदनच्या समितीत नायब तहसीलदार एस.जी. डोळस, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेगे, फकिरा देशमुख, प्रशांत लोखंडे यांचा समावेश होता. या समितीने हिंगोली तालुक्यातील ग्रामीण, बासंबा, कळमनुरी ठाणे हद्दीतील गावांना भेटी देऊन तंटामुक्तीचे मुल्यमापन केले. अंबडच्या समितीत पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्यासह तीन सदस्यांचा समावेश होता. या समितीने सेनगाव, हट्टा व गोरेगाव ठाणे हद्दीतील तंटामुक्त गावांना भेटी देवून तपासणी केली, अशी माहिती तंटामुक्त गाव मोहिमेचे जिल्हा समन्वयक जमादार शेख निजाम यांनी दिली. हिंगोली जिल्हा सातत्याने पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. ग्रामीण भागात तंटामुक्तीची चळवळ उभी राहिल्याने गावागावात शांतता नांदत आहे. शिवाय पारितोषिकांच्या रकमेतून गावातील विकास कामे मार्गी लागत आहेत. म्हणून तंटामुक्तीत हिंगोलीने आघाडी घेतली आहे. आता जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. जिल्ह्यातील काही समिती लवकरच परभणी जिल्ह्यात मूल्यमापनासाठी जाणार आहे. (प्रतिनिधी)