वर्षभरात ३५ टक्के कर वसुली
By Admin | Updated: March 15, 2017 00:01 IST2017-03-15T00:00:16+5:302017-03-15T00:01:22+5:30
जालना : नगर परिषदेच्या वतीने कर वसुली अभियान राबविण्या येत असून, विशेष अभियानातून दिवसाकाठी चार ते साडेचार लाखांची वसुली होत आहे.

वर्षभरात ३५ टक्के कर वसुली
जालना : नगर परिषदेच्या वतीने कर वसुली अभियान राबविण्या येत असून, विशेष अभियानातून दिवसाकाठी चार ते साडेचार लाखांची वसुली होत आहे. वर्षभरात पालिकेने ३५ टक्के कराची वसुली करण्यात आली. वर्षभरात सुमारे ५ कोटी ६१ लाख ८५ हजारांची वसुली झाली.
नगर पालिकेच्या वतीने एक फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान विशेष वसुली अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या वतीने मोहीम राबविण्यात येत असून, यासाठी दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एक एप्रिल २०१६ ते ११ मार्च २०१७ दरम्यान मालमत्ता कराची ३५.११ टक्के वसुली झाली. शिक्षणकर १४.३६ टक्के, पाणीकर २२.६३ टक्के, रोहयोकर २१.२६ टक्के, वृक्षकर ११.६६ टक्के, अग्निकर १२.९६ टक्के वसूल करण्यात आला. एकूण कराची वसुली २५.०९ टक्के झाली आहे. शहरातील कर वसुलीसाठी दहा पथकांची स्थापना करण्यात आली असून, पथकाकडून दिवसाकठी चार ते साडेचार लाख रूपयांची वसुली होत असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर व कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे यांनी दिली. नागरिकांनी थकित कराचा भरणा करावा, असे आवाहनही खांडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)