शासनाकडे थकला ३५ महिन्यांचा भत्ता
By Admin | Updated: August 15, 2014 00:02 IST2014-08-14T23:18:33+5:302014-08-15T00:02:17+5:30
परभणी : महाराष्ट्र शासनाने मे २००५ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देणे सुरु केले आहे. परंतु, ३५ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी अजूनही दिलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागले आहेत.

शासनाकडे थकला ३५ महिन्यांचा भत्ता
परभणी : महाराष्ट्र शासनाने मे २००५ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देणे सुरु केले आहे. परंतु, ३५ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी अजूनही दिलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागले आहेत.
एकीकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी असताना दुसरीकडे मात्र आमदार, मंत्र्यांच्या वेतनात अचानक वाढ केली जात आहे. विकासाच्या नावावर जाहिराती देऊन अनुदान वाटपाचा सपाटा लावला आहे. आता तर राज्यातील सर्वच सरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करुन ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीतही भत्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अचारसंहिता लागण्यापूर्वी सवलतींचा वर्षाव चालू ठेवला आहे. परंतु, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांची हक्काची रक्कम दिली जात नाही. तेव्हा मंत्रीमंडळाच्या बैठकीत ३९ महिन्यांची थकबाकीची रक्कम व्याजासह द्यावी. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक ‘नोटा’चा वापर करतील, असा इशारा ज्येष्ठ नागरिक जागृत मंचचे अध्यक्ष डॉ.मो.अ.गफ्फार, सुरेश जोशी, पद्माकर देशपांडे, एम.एस.बोधने, नसीर अहमद खान आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)