दुस-याचा भूखंड विक्री करून ३५ लाखाची फसवणुक, दाम्पत्यासह एजंटाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 19:05 IST2017-10-06T19:04:59+5:302017-10-06T19:05:16+5:30
स्वत:च्या मालकीचा भूखंड असल्याचे खोटे सांगून एका एजंटामार्फत दोन जणांनी एका व्यापाºयास एमजीएम परिसरातील सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाचा भूखंड विक्री करून ३५ लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले.

दुस-याचा भूखंड विक्री करून ३५ लाखाची फसवणुक, दाम्पत्यासह एजंटाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा
औरंगाबाद, दि. ६ : स्वत:च्या मालकीचा भूखंड असल्याचे खोटे सांगून एका एजंटामार्फत दोन जणांनी एका व्यापाºयास एमजीएम परिसरातील सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाचा भूखंड विक्री करून ३५ लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे या व्यवहारानंतर आरोपींनी पुन्हा तोच भूखंड एका डॉक्टरला विक्री करून त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्ह्याची यापूर्वी नोंद झालेली आहे.
सुधाकर गंगाधर उदावंत,सरलादेवी सुधाकर उदावंत आणि एजंट संतोष काशीनाथ पावटेकर अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २००८ ते २०१७ या कालावधीत ही फसवणुक झाली. तक्रारदार प्रकाश जगन्नाथ राणा (रा.विजयनगर)यांनी याविषयी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार २००८ मध्ये त्यांना भूखंड खरेदी करायचा होता. तेव्हा एजंअ संतोष पावटेकर हा त्यांना भेटला.यावेळी त्याने आरोपी सुधाकर उदावंत आणि सरलादेवी उदावंत यांच्या मालकीचा सिटी सर्वे नंबर १२४७६ मधील ७५ नंबरचा भूखंड विक्रीला असून त्याचे क्षेत्रफळ ५ हजार ४७६ चौरस फुट आहे.
यावेळी आरोपी उदावंत दाम्पत्यानेही त्यांचा भूखंड निर्विवाद असल्याचे विश्वासाने सांगितले आणि त्या भूखंडाच्या मालकीहक्काची बनावट कागदपत्रे त्यांना दाखविले. तक्रारदार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ३५ लाखात हा भूखंड खरेदी केला. याबाबतचे नोटरी खरेदीखत त्यांनी केले. नंतर हा भूखंड वादात असल्याचे समजले. वादामुळे भूखंडाची रजिस्ट्री होत नसल्याने तक्रारदार आणि आरोपी यांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करीत असल्याचा करारनामा केला. मात्र तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी त्यांना त्यांचे ३५ लाख रुपये परत केले नाही. आरोपींनी आपली जाणूनबुजून आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी मुकुंदवाडी ठाण्यात नोंदविली.
हृदयरोगतज्ज्ञाचीही फसवणुक
आरोपी उदावंत दाम्पत्य हे सराफ्यात राहते. त्यांनी २०१६ मध्ये हाच भूखंड हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत उदगिरे यांना विक्र ी करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. इसारपावतीपोटी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतल्यानंतर आरोपी गायब झाले. डॉक्टरांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी त्यांना विक्री केलेला भूखंडाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले. त्यांनी आरोपींना पैशाची मागणी केली असता त्यांना त्यांची रक्कमही त्याने परत केली नाही. यामुळे त्यांनीही पोलिसांत तक्रार नोंदविली.