शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

३५ फरार गुन्हेगारांची संपत्ती होणार जप्त; औरंगाबाद पोलिसांनी न्यायालयाकडून मिळविले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 12:37 IST

शहर पोलिसांना विविध गुन्ह्यांत तब्बल दीड हजार गुन्हेगार सापडत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी फरार गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्दे पहिल्या टप्प्यात ३५ फरारींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून मिळविल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.शहर आयुक्तालयांतर्गत विविध गुन्ह्यांत १,५२४ गुन्हेगार १५ ते २० वर्षांपासून पोलिसांना सापडत नाहीत

औरंगाबाद : शहर पोलिसांना विविध गुन्ह्यांत तब्बल दीड हजार गुन्हेगार सापडत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी फरार गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पहिल्या टप्प्यात ३५ फरारींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून मिळविल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

याविषयी अधिक माहिती अशी की, शहर आयुक्तालयांतर्गत विविध गुन्ह्यांत १,५२४ गुन्हेगार १५ ते २० वर्षांपासून पोलिसांना सापडत नसल्याचे वृत्त दि.२ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तामध्ये कोणत्या पोलीस ठाण्यांतर्गत किती आरोपी पोलिसांना हवे आहेत, याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली होती. ‘लोकमत’ने दिलेल्या या वृत्ताची गंभीर दखल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतली. यानंतर त्यांनी संबंधित गुन्हेगारांना कोर्टाकडून फरारी घोषित करणे आणि त्यांची चल-अचल संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिका-यांना दिले. आदेश प्राप्त होताच पोलीस ठाणेप्रमुखांनी त्यांना वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली. 

पहिल्या टप्प्यांत ३५ गुन्हेगारांना फरारी घोषित करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळविले. याबाबतची नोटीस आरोपीच्या घराच्या दारावर आणि प्रमुख चौक, गर्दीच्या ठिकाणी लावण्याची कार्यवाही सुरू झाली. महिनाभरात हे आरोपी हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाकडून घेतला जाणार आहे.

औरंगाबाद शहरात प्रथमच कारवाईयाविषयी बोलताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, गुन्हा केल्यापासून पसार झालेले आरोपी न सापडल्यास त्यांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई पोलिसांना करता येते. मात्र, आजपर्यंत शहर पोलिसांनी अशी कारवाई केली नव्हती. परिणामी, वॉन्टेड गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. ही बाब गंभीरतेने घेत आम्ही आता वॉन्टेड गुन्हेगारांना सीआरपीसी सेक्शन ८२ नुसार फरारी घोषित करण्याची आणि नंतर कलम ८३ नुसार त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली. पहिल्या टप्प्यात ३५ गुन्हेगारांची संपत्ती जप्त केली जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस