शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाड्यात रविवारी कोरोनाच्या ३४९ नव्या रुग्णांची वाढ; १० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 14:23 IST

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ११६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३४९ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सहा जिल्ह्यांमध्ये दहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ३५  नवे रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.  आतापर्यंत २० हजार ३६० बाधित रुग्ण आढळले असून कोरोनामुळे ५४९ जणांचा बळी गेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शिवाय दोघांचा मृत्यू झाला.  जिल्ह्यातील बाधितांची संख्या १५ हजार ७२७ वर पोहचली. यातील ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचे १८ रुग्ण नोंद झाले आहेत. दिवसभरात २३४ तपासण्यांमध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आता ७ हजार ९५ एकूण रुग्ण झाले असून, त्यातील ६ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १३० रुग्ण उपचार घेत आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे सहा रुग्ण आढळून आले.  त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३५९ वर पोहोचली.  आतापर्यंत ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोनाने आणखी तीन बळी घेतले. ४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६४ जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १५ हजार ५७९ इतका झाला आहे, तर १४ हजार ५८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ४९४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. जालना जिल्ह्यात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १२ हजार २८३  वर गेली असून त्यातील ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचे ६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णऔरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ११६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३, ३०० झाली आहे. यातील ४१, १७६ रूग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. तर एकूण १, १४५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस