तीन दिवसांत संकलित केले ३४ हजार कपडे..!
By Admin | Updated: November 15, 2016 00:54 IST2016-11-15T00:50:51+5:302016-11-15T00:54:26+5:30
जालना : हिवाळ्यात अनेक गरीब कुटुंब कपड्याविना थंडीत कुडकुडत असतात.

तीन दिवसांत संकलित केले ३४ हजार कपडे..!
जालना : हिवाळ्यात अनेक गरीब कुटुंब कपड्याविना थंडीत कुडकुडत असतात. या कुटुंबियांचा थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे, चप्पल, बूट मिळावेत या उद्देशाने स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने ‘माणुसकीची भिंत’ या उपक्र माच्या माध्यमातून ऋण रथाद्वारे कपडे व इतर साहित्य गोळा करण्यात आले. सोमवारी तिसऱ्या दिवशी या रथातून कपडे आणण्याऐवजी गरजू लोकांची वाहतूक केली गेली.
जालन्यातून गोळा होणारे साहित्य वृद्धाश्रम, अनाथालय पाठविण्यात येणार आहे. शनिवारी शिवाजी पुतळा, गांधी चमन या ठिकाणी उबदार कपडे दान करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. नागरिकांनी जुने, नवीन उबदार कपडे, चप्पल, बूट हे साहित्य आपापल्या परीने आणून दिले. या उपक्रमासाठी स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय सुरासे यांनी परिश्रम घेतले. विविध कपडे जालनेकरांनी दान करून आदर्श निर्माण केला आहे. हे साहित्य बीड येथील शांतीवन, औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रम, गेवराई येथील सहारा अनाथालय, अमरावती येथील प्रश्नचिन्ह आदी संस्थेतील अनाथ, निराधारांना देण्यात येणार आहे.