बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

By Admin | Updated: June 29, 2014 00:25 IST2014-06-29T00:12:21+5:302014-06-29T00:25:43+5:30

नांदेड: एसटी बस रस्त्याखाली घसरुन झालेल्या अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले़ ही घटना नांदेड-रोहीपिंपळगाव मार्गावर शिखाची वाडीनजीक सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़

34 passengers were injured in the accident | बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

नांदेड: एसटी बस रस्त्याखाली घसरुन झालेल्या अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले़ ही घटना नांदेड-रोहीपिंपळगाव मार्गावर शिखाची वाडीनजीक सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़
नांदेड येथून रोहीपिंपळगावकडे जाणारी बस (क्रमांक एम़एच़ १२ सीएच़ ८९८८) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले़ बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी झाले़ अन्य ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली़ बसचालक एस़एऩ गायकवाड हेही जखमी झाले़ जखमींमध्ये रोहिणी पिंपळगाव, टाकसाळा, बळीरामपूर, शीखाचीवाडी, आमदुरा आदी गावांतील रहिवाशांचा समावेश आहे.
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले़ यात पद्मीनबाई होन्टे (वय ६५), पारुबाई शिंंदे (४५), प्रसाद शिंदे (१८), देवीका शिंदे (१६), पारुबाई भालेराव (७०), भगिरथाबाई भालेराव (६०), दादाराव शिंदे (४५), सचिन शिंदे (१९), पूजा पुण्यबोईनवाड (१९), पार्वतीबाई मामिलवाड (४०), विश्वनाथ मामिलवाड ४५, शंकर गायकवाड (५२), सविता राजेमोड (२२), गयाबाई राजेमोड (४५), राऊबाई पांचाळ (४०), मोनिकाबाई वाघमारे (२२), जनाबाई खानसोडे (६५), कीशनबाई पवार (४०), जयश्री पवार (१०), आशाताई राक्षसमारे (३५), भायसर शिंदे (६०), मारोती आईनवाड (२०), संतुका पवार (६०), श्रीराम शिंदे (६५), उत्तम पांचाळ (४५), बालाजी शिंदे (६०), रत्नाकर हनमंते (२९), शेषेराव क्षीरसागर (३५), सुभद्राबाई केळकर (६०), मारोती भालेराव (६५), गंगाबाई भालेराव (६०), दादाराव शिंंदे (४५), फालाजी बागड (५०), मोहन भालेराव (६५), दत्तराम शिंदे (७५) यांचा समावेश आहे़ घटनास्थळी आगार व्यवस्थापक संजय वाळवे, एस़एस़ गायकवाड यांनी भेट देवून जखमींची विचारपूस केली़ रुग्णालयात विभाग नियंत्रण बी़डब्ल्यू़ घुले, नांदेड बसस्थानक प्रमुख सचिनसिंह चौहाण, कामगार अधिकारी जी़बी़ मरदोडे, उपयंत्र अभियंता पन्हाळकर यांनी भेट देवून अपघाताची चौकशी केली़ अपघात घडला त्यावेळी बसमध्ये ५८ प्रवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: 34 passengers were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.