जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३३९ शाळाचे नुकसान
By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:58+5:302020-12-04T04:11:58+5:30
--- योगेश पायघन औरंगाबाद - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३३९ शाळाचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी ५ कोटी ३१ लाख ४७ हजार ...

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३३९ शाळाचे नुकसान
---
योगेश पायघन
औरंगाबाद - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३३९ शाळाचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी ५ कोटी ३१ लाख ४७ हजार ६१५ रुपये निधींची आवश्यकता आहे. तर नवीन ३०४ वर्गखोल्यांची गरज असून त्यासाठी २२.४९ कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे २७.८१ कोटींची मागणी करण्यात आली आहे. सध्या जिल्हा नियोजन समितीतून मंजूर अनुदानातून ३३ टक्के तर १०० टक्के निधी मिळण्याच्या अपेक्षेने नियोजन जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग करत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून पुनर्विनियोजनानंतर प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी १२ कोटींपैकी ३३ टक्केनुसार ३ कोटी ९६ लाख निधी मिळेल. गेल्यावर्षीचे शिल्लक ५ कोटी ८२ लाख रुपये त्यातून ६ कोटी ९६ लाखांचे दायित्व वजा झाल्यावर केवळ २ कोटी ८२ लाखांचा निधी उरतो. त्याच्या दीडपट म्हणजे ४ कोटी २४ लाखांत केवळ ६० तर १०० टक्के निधी मिळाल्यास दीडपटीने १६ कोटी २९ लाख रुपयांतून २०३ वर्ग खोल्या बांधता येतील. तर आवश्यकता ३०४ नव्या वर्ग खोल्यांची आहे. अशी माहिती शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.
प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी मंजूर अनुदान १३ कोटींपैकी ३३ टक्के प्रमाणे ३ कोटी ८४ लाख मिळतील. गेल्यावर्षीची शिल्लक दोन कोटी यातून २ कोटी ७६ लाखांचे दायित्व दिल्यावर नियोजनासाठी ३ कोटी ७ लाखांचा निधी उपलब्ध होईल. त्याच्या दीडपट ४ कोटी ४१ लाखांची कामे करता येतील. तर १०० टक्के निधी मिळाल्यास दीडपटनुसार १८ कोटी ३४ लाखांची दुरुस्ती होऊ शकेल, असे गलांडे यांनी सांगितले.
--
शाळांची तालुकानिहाय स्थिती
---
तालुका - नुकसानग्रस्त शाळांची संख्या - दुरुस्तीचा अंदाजीत खर्च - नव्या वर्ग खोल्यांची गरज
औरंगाबाद ः ५२ ः २,६६,०५,००० ः ८२
पैठण ः ५४ ः ७५,०३,५६५ ः ७९
गंगापूर ः ४३ ः ५३,१५,००० ः ४५
वैजापूर ः ६७ ः १,४७,८०,००० ः ४१
कन्नड ः ७० ः ८०,२०,२०० ः २८
खुलताबाद ः ७ ः १४,४३,००० ः ८
फुलंब्री ः ११ ः १५,४५,००० ः १३
सिल्लोड ः ६७ ः ९५,४१,०५० ः ७८
सोयगाव ः २२ ः ५०,००,००० ः १२
एकूण ः ३३९ ः ५,३१,४७,६१५ ः ३०४ (२२,४९,६०,०००)