तालुक्यात ३३९ घरकुले मंजूर
By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:14:39+5:302014-07-16T01:25:10+5:30
रेणापूर : तालुक्यात इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत ४१ गावातील ३३९ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती गटविकास अधिकारी शाम पटवारी यांनी दिली़

तालुक्यात ३३९ घरकुले मंजूर
रेणापूर : तालुक्यात इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांना शासनाकडून २०१४-१५ या वर्षासाठी ४१ गावातील ३३९ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती गटविकास अधिकारी शाम पटवारी यांनी दिली़
तालुक्यात एकूण गावांपैकी इंदिरा आवास योजनेत आठ गावांचा समावेश असून, या गावातील १७९ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे़ त्यात निवाडा १०, बावची २६, सांगवी ३९, धवेली ३२, रेणापूर ४, कामखेडा ११, बिटरगाव २१, शेरा ३६ घरकुलांचा समावेश आहे़
रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील बेघर लाभार्थ्यांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थी गावांमध्ये डिगोळ देशमुख १, कोष्टगाव १, दिवेगाव २, धवेली २, गरसुळी २, कारेपूर २, खलंग्री २, कोळगाव २, माकेगाव २, रामवाडी-खरोळा २, सय्यदपूर २, सारोळा २, सिंधगाव २, तत्तापूर २, इटी, नागापूर ३, कुंभारी ३, सेलू ३, जवळगा ३, माणुसमारवाडी ४, तळणी ४, दर्जी बोरगाव ५, मोहगाव ५, घनसरगाव ७, रेणापूर ७, चाडगाव ८, मुरढव ८, पोहरेगाव ८, वांगदरी ८, पाथरवाडी १०, कुंभारवाडी १०, खरोळा १२, मोरवड १२, पानगाव १४ आदींचा समावेश आहे़