३३ पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:38 IST2017-10-06T00:38:34+5:302017-10-06T00:38:34+5:30
जिल्हा पोलीस दलातील ३३ कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत. त्यात ९ कर्मचाºयांना पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ कर्मचाºयांना पोलीस हवालदारपदी तर १३ कर्मचाºयांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती दिली आहे.

३३ पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा पोलीस दलातील ३३ कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत. त्यात ९ कर्मचाºयांना पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ कर्मचाºयांना पोलीस हवालदारपदी तर १३ कर्मचाºयांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती दिली आहे.
जिल्हा पोलीस दलात काम करणाºया कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांमार्फत तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिली जाते. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी पोलीस अधीक्षकांनी उत्कृष्ट सेवा देणाºया पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती देण्याचे आदेश काढले आहेत. गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार पोलीस मुख्यालयातील संतोष जोशी, मतीनोद्दीन मोहिनोद्दीन पठाण, जिंतूर येथील परमेश्वर कानडे, मोटर परिवहन विभागातील शेख हबीब शेख जिलानी, नानलपेठ ठाण्याचे रमेश कदम, पोलीस नियंत्रण कक्षातील यमुना लक्ष्मण आत्राम, पाथरी येथील अशोक ताठे, शहर वाहतूक शाखेतील बाबाहरी पौळ आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यातील बालासाहेब धोत्रे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यापदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
जिंतूर महामार्गचे पोलीस नायक गजेंद्र फुगनर, नानलपेठ ठाण्यातील संभाजी यमगर, परभणी महामार्गचे साहेब सुरवाड, पूर्णा येथील शेख नदीम शेख नबी, श्वान पथकातील अजीयोद्दीन इनामदार, ताडकळस येथील अण्णाजी सुरनर, पूर्णा येथील महादेव जानगर, ताडकळसचे हनुमान मरगळ, चारठाणा येथील निवृत्ती बडे, मोटार परिवहन विभागातील गणेश खंदारे आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील रोहिदास खंदारे या ११ कर्मचाºयांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.