३२०० लाभार्थी निवडणार
By Admin | Updated: July 5, 2014 00:42 IST2014-07-04T23:44:50+5:302014-07-05T00:42:56+5:30
नांदेड: विशेष घटक योजनेतंर्गत नवीन विहीर व इतर बाब घटकांच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांकडून २०१४-१५ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

३२०० लाभार्थी निवडणार
३२०० लाभार्थी निवडणार
नांदेड: विशेष घटक योजनेतंर्गत नवीन विहीर व इतर बाब घटकांच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांकडून २०१४-१५ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी जिल्ह्यातून ३२०० लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एम. टी. गोंडेस्वार यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर आधारित लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. तालुकानिहाय उद्दिष्ट असे-नांदेड २२८, मुदखेड ७६, अर्धापूर १०४, बिलोली २७०, धर्माबाद १२१, नायगाव ३०२, मुखेड ४१४, कंधार ३१९, लोहा २५६, हदगाव २३५, हिमायतनगर ७३, भोकर १४६, उमरी १२३, देगलूर ३४३, किनवट १३१ तर माहूर तालुक्याला ५९ लाभार्थी असे एकूण जिल्ह्यातून ३२०० लाभार्थ्यांच्या निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
नवीन विहीर व इतर बाब घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयास २० जुलै २०१४ पर्यंत पाठवायचे आहेत.
प्रस्तावासोबत संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी दिलेले सन २०१३-१४ या वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, लाभधारकाचा शेतीचा चालू वर्षाचा सातबारा व होल्डिंग उतारा जमिनीचा टोच नकाशा, सन २००२ च्या सर्वेक्षणानुसार दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट असल्याबाबत संबंधित लाभार्थ्यांचे दारिद्र्य रेषेचा यादी क्रमांक उल्लेख असलेले गटविकास अधिकारी यांचे मूळ प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत, ग्रामसभेचा निवड करण्याबाबतचा ठराव देणे आवश्यक आहे.
वार्षिक उत्पन्न ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे, दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही. परंतु लाभधारकांस १ मे २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे. (प्रतिनिधी)