३२ जलस्त्रोत्र कोरडेठाक

By Admin | Updated: December 18, 2014 00:34 IST2014-12-18T00:12:13+5:302014-12-18T00:34:46+5:30

जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी दिवसेंदिवस घट होत आहे.

32 water body drying | ३२ जलस्त्रोत्र कोरडेठाक

३२ जलस्त्रोत्र कोरडेठाक


जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी दिवसेंदिवस घट होत आहे. नोव्हेंबरच्या मध्यंतरातच म्हणजे १७ डिसेंबरअखेर या जिल्ह्यातील ७ पैकी २ मध्यम प्रकल्प व ५७ पैकी ३१ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी पडलेल्या अल्पशा पावसाने खरीप व रबी पिकांना मोठा तडाखा बसला. पाठोपाठ सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला. विशेषत: आॅक्टोबर अखेरपासूनच जिल्ह्यातील दोन डझन गावांना टंचाईने ग्रासले असून त्या गावांमधून टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नोव्हेंबरच्या मध्यंतरापर्यंत हे चित्र आणखीच बिकट बनले आहे. या महिन्यातच ही स्थिती तर उन्हाळ्याच्या तीन-चार महिन्यात काय परिस्थिती ओढवेल, या चिंतेने जिल्हावासियांना ग्रासले आहे. कारण, शहरांसह खेड्या-पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांमधीलच पाणी पातळी दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.४
जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ७४ टक्के ऐवढा पाणी साठा उपलब्ध आाहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंंबून असणाऱ्या शेकडो खेड्या-पाड्यांचा पाणी पुरवठा जानेवारी अखेरपर्यंत सुरळीत राहिल, असा अंदाज लघु पाटबंधारे खात्याने व्यक्त केला. ४
जालना तालुक्यातील वाकी, दरेगाव, नेर, कुंबेफळ, बदनापूर तालुक्यातील राजेवाडी, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, अंबड तालुक्यातील भातखेडा, खडकेश्वर, घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, चिंचोली, मुसा भद्रायणी, मानेपुरी, मंठातील वाई, तळतोंडी, परतवाडी येथील प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे.४
बदनापूर तालुक्यातील अप्पर दूधना प्रकल्प कोरडाठाक आहे. या प्रकल्पात गेल्या दोन वर्षी म्हणजे २०११ साली १७ डिसेंबरपर्यंत ५.९८ टक्के ऐवढा पाणी साठा शिल्लक होता. त्याआधी म्हणजे २०१० साली १२.३७ व २००९ साली २.९४ टक्के पाणी साठा शिल्लक होता. गेल्यावर्षी म्हणजे २०१४ साली या प्रकल्पातील पाणी पातळी ज्योत्याखाली गेली होती. यावर्षी तर या प्रकल्पात भर पावसाळ्यात सुध्दा थेंबभर पाणी साचले नाही.४
या जिल्ह्यातील जामवाडी (ता.जालना) लघु प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. त्यापाठोपाठ बदनापूरातील सोमठाणा, अंबड तालुक्यातील डावरगाव, मार्डी, रोहिलागड, कानडगाव, धनगर पिंपरी, टाका, लासूरा हे प्रकल्प कोरडेठाक पडले असून घनसावंगीतील बोररांजणी, मांदळा हे दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत.४
जिल्ह्यातील कल्याण मध्यम प्रकल्पात (ता.जालना) १८ टक्के, धामना (ता.भोकरदन) मध्यम प्रकल्पात १६ टक्के व जीवनरेखा (ता.जाफ्राबाद) मध्यय प्रकल्पात २६ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पातील पाणी पातळी ज्योत्याखाली पोहोचली आहे.

Web Title: 32 water body drying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.