३२ गावात बंदोबस्ताविना पोळा
By Admin | Updated: August 26, 2014 23:55 IST2014-08-26T23:40:01+5:302014-08-26T23:55:46+5:30
कळमनुरी : शहर व परिसरात २५ आॅगस्ट रोजी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

३२ गावात बंदोबस्ताविना पोळा
कळमनुरी : शहर व परिसरात २५ आॅगस्ट रोजी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३२ गावात पोलिस बंदोबस्ताविना पोळा साजरा करण्यात आला.
कळमनुरी तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम २००७ पासून राबविल्या जात आहे. पोलिस बंदोबस्ताविना पोळा साजरा करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोडेगाव, सालेगाव, घोळवा, नवखा, तरोडा, जामगव्हाण, माळेगाव, सांडस, हरवाडी, रामवाडी, धानोजा ज., सेलसुरा आदी गावांनी पोळा बंदोबस्ताविना साजरा केला. तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यापुढेही सण, उत्सव पोलीस बंदोबस्ताविना साजरे केले जाणार आहे. आगामी गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ साठी तंटामुक्त समिती व अध्यक्षांची बैठक २८ आॅगस्ट रोजी बोलावून त्यांना एकच गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे हद्दीतील जास्तीत जास्त गावात ‘एक गाव एक गणपती’ वर भर दिल्या जाणार आहे. पोळ्याप्रणाणे गणेशोत्सवही साजरा करण्यात येणार असल्याचे सोनवणे म्हणाले. (वार्ताहर)