३२ महिन्यांत ४० कोटींचे उत्पन्न

By Admin | Updated: January 15, 2016 23:44 IST2016-01-15T23:42:07+5:302016-01-15T23:44:54+5:30

परभणी : शहर मनपाला डिसेंबर २०१२ ते जुलै २०१५ या ३२ महिन्यांच्या कालावधीत स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून ३९ कोटी ९४ लाख ८८ हजार ५७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

In 32 months, 40 crores generated | ३२ महिन्यांत ४० कोटींचे उत्पन्न

३२ महिन्यांत ४० कोटींचे उत्पन्न

परभणी : शहर मनपाला डिसेंबर २०१२ ते जुलै २०१५ या ३२ महिन्यांच्या कालावधीत स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून ३९ कोटी ९४ लाख ८८ हजार ५७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
न.प.चे रुपांतर झाल्यानंतर डिसेंबर २०१२ पासून स्थानिक संस्था कर मनपा हद्दीत व्यापाऱ्यांना लागू करण्यात आला. ३२ महिन्यांच्या कालावधीत स्थानिक संस्था करासाठी शहरातील ३ हजार २०० व्यापारी पात्र ठरले होते. या व्यापाऱ्यांची महिन्याकाठी होणारी आर्थिक उलाढाल मनपाकडून तपासण्यात येत होती. त्यानुसार व्यापाऱ्यांना एलबीटी कर आकारण्यात येत होता. यामध्ये करा व्यतिरिक्त दंड, शास्ती सुद्धा लावण्यात येत होती. एलबीटीच्या माध्यमातून मनपाला मोठा आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाला होता. २०१२-१३ मध्ये आर्थिक वर्षात डिसेंबर ते मार्च या कालावधीत पाच कोटी ४ लाख ६७ हजारांचे उत्पन्न मनपाला मिळाले होते. यानंतर दरवर्षी या कराच्या रकमेमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे मनपाचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने सुरु होते. १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी कर रद्द करण्यात आला. याऐवजी शहरात अभय योजना लागू करण्यात आली. मागील तीन वर्षात मनपाला एलबीटीच्या करातून ३९ कोटी ९४ लाख ८८ हजार ५७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Web Title: In 32 months, 40 crores generated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.