रमाई आवास योजनेअंतर्गत ३१४ लाभार्थ्यांना मंजुरी

By Admin | Updated: July 10, 2017 00:32 IST2017-07-10T00:27:38+5:302017-07-10T00:32:40+5:30

नांदेड : महापालिका हद्दीसाठी शासनाने १ हजार ६७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी आजपर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे़

314 beneficiaries under Ramai Awas Yojana | रमाई आवास योजनेअंतर्गत ३१४ लाभार्थ्यांना मंजुरी

रमाई आवास योजनेअंतर्गत ३१४ लाभार्थ्यांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका हद्दीसाठी शासनाने १ हजार ६७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी आजपर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे़ मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी ३१४ लाभार्थ्यांना घरकुलासाठी नुकतीच मंजुरी दिली आहे़
शहरात बीएसयुपी योजनेतंर्गत झोपडपट्टी असलेल्या भागात घरकुलाची योजना यशस्वीपणे राबविली होती़ याचदरम्यान रमाई आवास योजनेसाठीही प्रस्ताव स्वीकारण्यात आले़ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत २ लाख रूपये अनुदान देण्यात येत होते़
आतापर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली असून लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यास लेखी आदेश देण्यात आले आहेत. तसेच घरकुलाच बांधकामास सुरुवातही झाली आहे. सदर योजनेच्या शासन निर्णयानुसार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावयाचे असून त्यानुसार लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात अली आहे. तसेच उर्वरित ९७ लाभार्थ्यांची यादीही लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये यापूर्वी २ लाख रूपये अनुदान मिळत होते ते आता शासनाने वाढवून प्रधानमंत्री आवास योजनेनुसार अडीच लाख करण्यात आले आहे. यापूर्वी बांधकाम करावयाच्या २५़० चौ़ मी़ चटई क्षेत्रफळामध्ये वाढ करून ३०़० चौ़ मी़ करण्यात आले आहे. सदर लाभार्थ्यांची यादी मनपा बीएसयूपी विभाग व समाजकल्याण सहायक आयुक्त यांच्याकडून अंतिम करण्यात आली. सदर योजनेस निधी उपलब्ध झाला आहे.

Web Title: 314 beneficiaries under Ramai Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.