३१ जोडपी विवाहबद्ध
By Admin | Updated: December 25, 2015 00:01 IST2015-12-24T23:50:59+5:302015-12-25T00:01:58+5:30
परभणी : शहरातील रोशनखान मोहल्ला बारादरी येथील मैदानावर ईद-ए- मिलादून्नबी निमित्त २४ डिसेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला.

३१ जोडपी विवाहबद्ध
परभणी : शहरातील रोशनखान मोहल्ला बारादरी येथील मैदानावर ईद-ए- मिलादून्नबी निमित्त २४ डिसेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. या विवाह सोहळ्यात ३१ जोडपी विवाहबद्ध झाली.
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मागील २९ वर्षापासून विवाह सोहळ्याचे आयोजन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात येते. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता बारादरी येथील मैदानावर हा विवाहसोहळा पार पडला. समितीचे अध्यक्ष अलहज अब्दुल हफीज, उपाध्यक्ष मो. ताहीर अलीखान, सचिव सय्यद अहेमद हाश्मी, अलहज शेरुभाई, हाजी सिराजोद्दीन फारोखी, समन्वयक अन्वर खान, हाजी सेठ अशरफ साया, प्रा. डॉ. अहेमद हाश्मी, मौलाना रफियोद्दीन अशरफी, मो. अशफाक, हाफीजो खारी, मो. मुजीब अशरफ, खाजी सय्यद जमीरोद्दीन, जफर अहेमद खान, फेरोजखान, मो.खाजा जाकेर कुरेशी, सय्यद सुलतान, अब्दुल आलीम यांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना घरगुती साहित्य भेट म्हणून देण्यात आले. विवाह सोहळ्यास सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळ्याला उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेनेचे अतुल सरोेदे, बाळासाहेब जामकर, भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, मुकिमोद्दीन काजी, बाजार समितीचे उपसभापती दिलीप आवचार, सत्तार इनामदार, अॅड. जावेद कादर, डॉ. जावेद अथर, लियाकत अली अन्सारी, वसीम कबाडी यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन वधु-वरांना शुभेच्छा दिल्या.
(प्रतिनिधी)