३० कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी दांडी
By Admin | Updated: July 27, 2014 01:15 IST2014-07-27T00:17:25+5:302014-07-27T01:15:53+5:30
जालना : शहरातील विविध प्रभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी अचानक पाहणी केली असता ३० सफाई कामगार गैरहजर आढळले.

३० कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी दांडी
जालना : शहरातील विविध प्रभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी अचानक पाहणी केली असता ३० सफाई कामगार गैरहजर आढळले. या कामगारांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.
नवीन जालना विभागातील रामनगर, गांधीनगर, मंगळबाजार तसेच जुना जालना विभागातील ईदगाह मैदान येथील साफसफाईची पाहणी नगराध्यक्षा रत्नपारखे यांनी केली. रामनगर, मंगळबाजार, काद्राबाद भागात १८ कायम कर्मचारी तसेच ठेकेदारांमार्फत असलेले १२ कामगार गैरहजर आढळून आले. यावेळी नगराध्यक्षांसमवेत न.प.चे प्रशासकीय अधिकारी केशव कानपुडे, स्वच्छता निरीक्षक संजय खर्डेकर, राजू मोरे आदी उपस्थित होते. ही तपासणी सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)