३० खांबावरील विद्युत तार लंपास
By Admin | Updated: October 18, 2016 00:15 IST2016-10-18T00:14:29+5:302016-10-18T00:15:56+5:30
वाशी : शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ३० विद्युत खांबावरील तारा चोरट्यांनी लंपास केल्या़

३० खांबावरील विद्युत तार लंपास
वाशी : शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ३० विद्युत खांबावरील तारा चोरट्यांनी लंपास केल्या़ ही घटना शनिवारी रात्री काळेवाडी रोडलगत घडली़ दरम्यान, मागील चार-पाच महिन्यात जवळपास १८० विद्युत खांबावरील तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़
तालुक्यातील केळेवाडी मार्गालगत शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी किसनराव कवडे यांच्या शेतातील डीपीवरील ३० विद्युत खांबावरील तारा लंपास केल्या आहेत़ यापूर्वी मागील आठवड्यात टेंभीजवळील वीज वाहिनेची ४० खांबावरील तारांची चोरी झाली होती़ दोन दिवसापूर्वीच सारोळा मांडवा शिवारातील १५ खांबावरील विजेच्या तारांची झाल्याची माहिती वीज कंपनीचे अभियंता भुरेवार यांनी दिली. शेतीपंपासाठी असणाऱ्या वीजकंपनीच्या खांबावरील तारांच्या चोरीत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ तारा चोरीस आळा घालण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यासह शेतकऱ्यांनीच आता पावले उचलणे गरजेचे आहे़ तसेच ज्या वीज कंपनीच्या वाहिन्यावरील तारेची चोरी झाली आहे़ त्याचा शोध मात्र, अद्यापही पोलिसांना लागलेला नाही़ दोन ते तीन गुन्ह्यातील चोरीची तार पकडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव महानोर यांनी दिली. मात्र, चोरीस गेलेल्या तारेमध्ये व पोलिसांनी जप्त केलेल्या तारेमध्ये मोठी तफावत दिसून येते. तारेची चोरी उघड केल्याचा दावा जरी पोलिसांकडून करण्यात आला असला तरी ज्या प्रमाणात चोरी झाली आहे़ त्या प्रमाणात तारांची जप्ती झालेली नाही़ (वार्ताहर)