शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उजनीमधून ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:35 IST

सहा महिन्यांत या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणात वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे ५४ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला. तसेच कोल्हापूर, सांगलीत पुराचे वाहून जाणारे ३० टीएमसी पाणी उजनीमधून मराठवाड्याला देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सहा महिन्यांत या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात केली.

‘सीएमआयए’च्या पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. एमआयटी कॉलेज येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, मराठवाड्यातील जनता कायम दुष्काळाचा सामना करीत असते. येथील जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणाऱ्या नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदापात्रात ५४ टीएमसी पाणी आणायचे आहे. २०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या नद्यांच्या पुरामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले होते. अन्य राज्यांच्या पाण्याचा वाटा वगळता हे पुराचे पाणी सुमारे १७० टीएमसी आहे. यातील ३० टीएमसी पाणी उजनीत आणून नवीन योजना मराठवाड्यासाठी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आधीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत या प्रकल्पाचे अंदाजपत्रक (डीपीआर) तयार होतील. यानंतर प्रकल्पाला गती येईल. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या या नवीन योजनेमुळे उपस्थितांमध्ये आनंद पसरला.

कार्यकारी संचालक स्तरावर समिती स्थापन करामुख्यमंत्र्यांची घोषणा चांगली आहे. नदीजोड प्रकल्पाचे ५४ टीएमसी पाणी असो किंवा आता उजनीजवळून ३० टीएमसी पाणी; मराठवाड्याला देण्यासाठी घोषित केलेल्या नवीन योजनेचे पाणी केवळ पावसाळ्यातील तीन महिन्यांत उचलावे लागेल. मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यात पाण्याचा कायम दुष्काळ असतो, तेथे नेऊन साठवावे लागेल. हे पाणी उचलून कोठे आणि कसे साठवायचे याकरिता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांच्या स्तरावर एक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी मान्यता दिली होती. मात्र, अद्याप त्यांनी समिती स्थापन केलेली नाही. या कामासाठी आम्ही तांत्रिक सहकार्य करण्यास तयार आहेत.- डॉ. शंकरराव नागरे, अध्यक्ष, मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा