जलकुंभावर ३० सुरक्षारक्षकांचा पहारा
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:12+5:302016-04-03T03:50:37+5:30
लातूर : पाणीटंचाईच्या काळात जलकुंभावर पाणी वितरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेने ३० सुरक्षारक्षकांची तीन महिन्यांसाठी नेमणूक केली आहे़

जलकुंभावर ३० सुरक्षारक्षकांचा पहारा
लातूर : पाणीटंचाईच्या काळात जलकुंभावर पाणी वितरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेने ३० सुरक्षारक्षकांची तीन महिन्यांसाठी नेमणूक केली आहे़ यात २० पुरूष व १० महिला होमगार्डचा समावेश आहे़ जलकुंभ परिसरात कलम १४४ लागू केल्यावरही त्याचे उल्लंघन होत असल्याने होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे़
पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांची ओरड वाढत असल्याने जलकुंभावर सामाजिक संघटना, नगरसेवकही आंदोलन करीत आहेत़ अनेकदा पाणी वितरणात अडथळा निर्माण होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले़ तरीही गोंधळ होतच असल्याने ३० होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत़ ३ महिन्यांसाठी घेतलेल्या होमगार्डला नियमानुसार भत्ते मनपा देणार आहे़
टाकीवर गोंधऴ़़
विवेकानंद पाण्याच्या टाकीवर नेहमीच गोंधळ घातला जात आहे़ शनिवारी एका नगरसेवकाने कुलूप तोडून टाकीवर धाव घेतली़ यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची चर्चा असून यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे़
क्षेत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी म्हणाले, हे आंदोलन वगैरे काही नव्हते़ पाणी पाहण्यासाठी नगरसेवक विनोद रणसुभे टाकीवर गेले होते़