३० टक्के मतांवरही ‘लॉटरी’!

By Admin | Updated: September 28, 2014 00:20 IST2014-09-28T00:20:59+5:302014-09-28T00:20:59+5:30

जय तिपाले , बीड युती, आघाडीच्या प्रमुख उमेदवारांतील लढसंतींमुळे गतवेळी विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांना ४५ टक्क्यांहून अधिक मते घ्यावी लागली होती़ आता बहुरंगी लढती होत आहेत़

30 percent votes too 'lottery'! | ३० टक्के मतांवरही ‘लॉटरी’!

३० टक्के मतांवरही ‘लॉटरी’!


जय तिपाले , बीड
युती, आघाडीच्या प्रमुख उमेदवारांतील लढसंतींमुळे गतवेळी विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांना ४५ टक्क्यांहून अधिक मते घ्यावी लागली होती़ आता बहुरंगी लढती होत आहेत़ शह- काटशहाच्या राजकारणामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असून ३० टक्के मते मिळविणाऱ्या उमेदवारालाही आमदारकीची ‘लॉटरी’ लागू शकते़
जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत़ आतापर्यंत कुठल्याही दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत ‘स्ट्रेट फाईट’ झालेल्या आहेत़ फार तर तिरंगी लढती होत असत़ आता स्थिती याऊलट आहे़ युती, आघाडीतील फाटाफुटीने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी दंड थोपटून आखाड्यात उडी घेतली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत़ त्यामुळे आता प्रत्येकाला आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे़
याशिवाय डावी आघाडी, अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवारही नशीब आजमावत आहेत़ सर्वांनीच वेगळ्या चुली मांडल्याने मतदारांना उमेदवार निवडण्यासाठी मोठा वाव आहे़ दरम्यान, गतवेळी जिल्ह्यात एकूण मतांच्या ४५ टक्क्यांहून अधिक मते घेणारे उमेदवार जिंकले होते़ यावेळी मतांचे विभाजन अटळ असल्याने ३० टक्के मते घेणारा उमेदवारही विजय मिळवू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे़
कोण किती पाण्यात ?
स्वतंत्र लढतीत कोण कोणाची मते खेचतो? यावर देखील बऱ्याचअंशी भवितव्य अवलंबून राहणार आहे़ मतदान करताना उमेदवार, पक्ष, जात या साऱ्या बाबी गृहित धरल्या जातात़ प्रत्येकाला एकाचवेळी चार ते पाच प्रभावी पहेलवानांशी झुंजायचे आहे़ त्यामुळे सर्वांचीच कसोटी लागणार आहे़ अशा स्थितीत कोण किती पाण्यात आहे? अन् कोण कोणाला भारी ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे़

Web Title: 30 percent votes too 'lottery'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.