जालन्यात वाहन तपासणीत ३० लाख ७८ हजारांची रोकड पकडली
By Admin | Updated: November 14, 2016 00:34 IST2016-11-14T00:37:19+5:302016-11-14T00:34:41+5:30
ज्ाालना: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या वाहन तपासणीत दोन ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली.

जालन्यात वाहन तपासणीत ३० लाख ७८ हजारांची रोकड पकडली
ज्ाालना: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या वाहन तपासणीत दोन ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणचे एकूण ३० लाख ७० हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून, संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस. टी. व व्ही.एस. टी पथक स्थापन करण्यात आलेले आहे. जालन्यात सहा वेगवेगळी पथके कार्यरत आहेत. यातील पथक क्रमांक ३ ने जालना - औरंगाबाद मार्गावरील टोलनाक्याजवळ रविवारी वाहन तपासणी केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास औरंगाबादहुन जालन्याकडे येणाऱ्या कार (एम.एच. १४ एफ. सी. २४९३) ची तपासणी करण्यात
आली. या तपासणीत २१ लाख ७० हजार ५० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली.
तसेच पथक क्रमांक १ ने जालना- भोकरदन रस्त्यावर राजूर टी पॉर्इंटवर कार (एम.एच २१ ए.एच ५००६) च्या केलेल्या तपासणीत ९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
दोन्ही प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.