शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी हाती; एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीने सांगितलं ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:45 IST

दरोड्याचा दुसरा मास्टरमाइंड सुरेश गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख याच्या वाट्याचे २०० ग्रॅम साेने अंबाजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सूर्यकांत श्रीराम मुळेकडे ठेवले होते. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीची तब्बल ८ तास पोलिसांनी केली चौकशी, त्यानंतर लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी जप्त  

 

छत्रपती संभाजीनगर : उद्याेजक संतोष लड्डा यांचे लुटलेले ३० किलो चांदीचे भांडे, दागिने जप्त करण्यात पोलिसांना २४ दिवसांनी अखेर यश आले. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरने त्याच्या कारच्या डिकीत ते ठेवले होते. १७ रोजी ती कार पडेगावच्या हिंदुस्तान गॅरेजसमोर उभी करून तो पसार झाला होता. अमोलची बहीण रोहिणी खोतकर (रा. पडेगाव) हिच्या मंगळवारच्या चाैकशीनंतर उलगडा होताच पोलिसांनी कारमधून ही चांदी जप्त केली. मात्र, साडेपाच किलो सोन्याचे गूढ उलगडलेले नाही.

आतापर्यंत १५ आरोपींना अटक झाली आहे. सहा आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी होण्याची शक्यता आहे. अमोलची बहीण रोहिणी व मैत्रीण हाफिजा ऊर्फ खुशी अख्तर अली शेख हिच्या चौकशीची पोलिसांना प्रतीक्षा होती. खुशीची चौकशी बाकी असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिचा ताबा देऊ, असे सीआयडीने पोलिसांना कळवले आहे. तिच्या चौकशीतून सोन्याचे गूढ उकलण्याची अपेक्षा आहे.

रोहिणीचा ७ पानांचा जबाबरविवारी पोलिसांनी रोहिणीला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. सोमवारी ती दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्तालयात हजर झाली. आठ तासांच्या चौकशीनंतर अमोलच्या कारमधील चांदीविषयी तिने कबुली दिली. १८ मे रोजी त्याने दोन बॅग फोक्सवॅगन कारमध्ये ठेवत ती गॅरेजसमोर उभी केली. ही बाब रोहिणीला माहीत होती. निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक प्रवीण पाथारकर, संदीप सोळुंके, संदीप शिंदे यांनी धाव घेत कार उघडल्यावर दोन बॅग भरून चांदी, काही रक्कम सापडली. त्यानंतर रोहिणीचा लेखी जबाब व जवळपास ५० मिनिटांचा व्हिडीओवर जबाब नोंदवण्यात आला.

आणखी एक गजाआडदरोड्याचा दुसरा मास्टरमाइंड सुरेश गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख याच्या वाट्याचे २०० ग्रॅम साेने अंबाजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सूर्यकांत श्रीराम मुळेकडे ठेवले होते. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सूर्यकांतवर आतापर्यंत जवळपास १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहर पोलिसांनी त्यास २०१२, तर बीड पोलिसांनी २०१६ मध्ये मोक्कात अटक केली होती. दरोड्यानंतर गंगणेला आपण पकडले जाणार नाही, असा अतिआत्मविश्वास होता. त्यातून त्याने १५ मे रोजी दरोडा टाकल्यानंतर १८ मे रोजी मारुती ब्रिझा कार विकत घेतली. पोलिस लवकरच ती कार जप्त करणार आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी