दूध उत्पादकांना मिळणार प्रतिलिटर ३० पैैसे लाभांश
By Admin | Updated: August 15, 2014 01:14 IST2014-08-15T00:51:54+5:302014-08-15T01:14:24+5:30
औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक अधिमंडळ बैठकीत दूध उत्पादकांना प्रती लिटर ३० पैैसे लाभांश देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

दूध उत्पादकांना मिळणार प्रतिलिटर ३० पैैसे लाभांश
औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक अधिमंडळ बैठकीत दूध उत्पादकांना प्रती लिटर ३० पैैसे लाभांश देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
येथील पाटीदार भवनात ही बैैठक संपन्न झाली. आ. डॉ. कल्याण काळे, संघाचे उपाध्यक्ष कचरू डिके, संचालक नंदलाल काळे, राजेंद्र जैैस्वाल, गोकुळसिंह राजपूत, राजेंद्र पाथ्रीकर, पुंडलिक काजे, आसाराम तळेकर, शीलाबाई कोळगे, बायसाबाई जाधव, व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
मागील वर्षीच्या सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन विविध ठरावास यावेळी मान्यता देण्यात आली. सभासदांना प्रती लिटर ६० पैैसे लाभांश देण्याची मागणी यावेळी आ. कल्याण काळे यांनी केली. सोबतच हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाने चांगली कामगिरी केल्याचा गौरवही त्यांनी केला. अध्यक्षीय समारोप करताना हरिभाऊ बागडे म्हणाले, आम्ही संघाला तोट्यातून बाहेर काढून संघाची मालमत्ता उभी केली आहे; परंतु ६० पैैसे लाभांश वाटप करण्याएवढी संघाची आर्थिक ताकद नाही. आ. काळे हे राज्याच्या सत्तेत आहेत. गारपीट व दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी १० हजार रुपयांची मागणी आम्ही केली होती. सत्तेत असूनही ते पूर्ण करू शकले नाहीत. येथे ते सत्तेत नसल्यामुळे अवास्तव मागणी करीत आहेत. संघाला ६१ लाख ४० हजार रुपये नफा झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीत सदस्यांना मदत करणे शक्य होईल.
एक नजर या वर्षातील आकडेवारीवर
दूध संकलन प्रति दिन (सरासरी)- ७३ हजार ३०४ लिटर
दूध वितरण पॅकिंग प्रति दिन (सरासरी) ५० हजार ९७६ लिटर
वर्षभरातील पशुखाद्य विक्री - १५८१ मे. टन.
टँकरद्वारे प्रति दिन दूध वितरण - २२ हजार ४०४ लिटर
निव्वळ नफा - ६१ लाख ४० हजार