३० टक्के ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’
By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-28T00:11:38+5:302015-04-28T00:31:43+5:30
सोमनाथ खताळ , बीड बदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते

३० टक्के ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’
सोमनाथ खताळ , बीड
बदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते. १० टक्के ग्राहक मात्र बँकिंग व्यवहारात परिपूर्ण आहेत. ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, इतरांच्या मदतीने केलेले आर्थिक व्यवहार अनेकांच्या अंगलट आले. त्यामुळे बँकिंग ज्ञान वाढविण्याची गरज असल्याचा निष्कर्ष निघाला.
पंतप्रधानांनी गरीबांचेही बँकेत खाते असावे, या उदात्त हेतूने जनधन योजना सुरू केली. मात्र, अनेकांना बँकेते खाते कसे खोलायचे ? पैसे खात्यावर कसे भरायचे ? कसे काढायचे ? धनाकर्ष, धनादेश म्हणजे काय ? हेच माहीत नाही. त्यामुळे जनधन सारख्या कितीही योजना आल्या तरी ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’ असेल तर या योजनांचा हेतू साध्य होणे शक्य नाही.
अनेक ग्राहक तासनतास बँकांच्या पायऱ्यावर ताटकळतात, शिवाय अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात, असे अनुभव ग्रामीण ग्राहक बोलून दाखवितात.
३० टक्के ग्राहक पेनाशिवाय बँकेत
बँकेत यायचे म्हटले की पेन सोबत असणे गरजेचे आहे, मात्र सोबत पेन बाळगणे ३० टक्के लोकांना नकोसे वाटले तर ७० टक्के लोक स्वत:चा पेन घेऊन आले. स्लीप भरण्यासाठी अथवा बँकेत इतर अर्ज भरण्यासाठी ग्राहक दुसऱ्यांकडेच हात पसरत असल्याचे दिसून आले. काम झाल्यानंतर पेन परत देण्याऐवजी तसाच खिशाला अडकवण्याचे प्रकारही दिसून आले.
अज्ञान पडतेय महागात
आज अनेकांना बँकेचे व्यवहार कशाप्रकारे चालतात, आणि त्याचे काय नियम असतात, याची माहिती नसल्याने फसवाफसवीचे प्रकार घडतात, हे वास्तव आहे. मात्र बँकांनाही व्यवहाराच्या जनजागृतीसाठी वेळ नाही.