पाचव्या फेरीत ३ वाळूघाटांचा लिलाव
By Admin | Updated: April 20, 2016 23:41 IST2016-04-20T23:17:16+5:302016-04-20T23:41:32+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात असलेल्या ५६ वाळूघाटांसाठी लिलावाची पाचवी फेरी निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांच्या दालनात बुधवारी घेण्यात आली.

पाचव्या फेरीत ३ वाळूघाटांचा लिलाव
लातूर : लातूर जिल्ह्यात असलेल्या ५६ वाळूघाटांसाठी लिलावाची पाचवी फेरी निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांच्या दालनात बुधवारी घेण्यात आली. यावेळी तीन घाटांचा लिलाव झाला. लातूर तालुक्यातील वांजरखेडा, सारसा व देवणी तालुक्यातील जवळगा लिलावाची बोलणी पूर्ण झाली.
लातूर तालुक्यातील वांजरखेडा येथील वाळूघाटाची सरकारी किंमत ३ लाख ९ हजार ७५० असून, लिलावात १६ लाख ४० हजारांना हा वाळूघाट देण्यात आला. लिलावात शामा कन्स्ट्रक्शन आणि माऊली ट्रेडर्स यांनी सहभाग घेतला होता. परंतु, राजवीर ट्रेडर्सचे सूर्यकांत पवार यांना हा घाट १६ लाख ४० हजारांत देण्यात आला. सारसा येथील वाळूघाटाची सरकारी किंमत ३ लाख १९ हजार ८७५ असून, माऊली ट्रेडर्सचे पोपटराव भिसे यांनी हा वाळूघाट ३ लाख ३० हजार रुपयांत घेतला.
देवणी तालुक्यातील जवळगा येथील वाळूघाटाची सरकारी किंमत ९ लाख ४० हजार १२५ रुपये असून, हा वाळूघाट पटेल ट्रेडर्सचे सय्यद अमिर महेमुद यांनी ९ लाख ५० हजार रुपयाला घेतला. (प्रतिनिधी)