३ हजारांवर झाले प्रवेश

By Admin | Updated: July 12, 2014 00:35 IST2014-07-12T00:35:00+5:302014-07-12T00:35:00+5:30

कंधार : तालुक्यात जि़प़ शाळांची संख्या १८९ आहे़ विद्याविषयक वर्षे २०१४-२०१५ मध्ये पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात आला़

3 thousand votes | ३ हजारांवर झाले प्रवेश

३ हजारांवर झाले प्रवेश

कंधार : तालुक्यात जि़प़ शाळांची संख्या १८९ आहे़ विद्याविषयक वर्षे २०१४-२०१५ मध्ये पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात आला़ इयत्ता पहिलीसाठी दाखलपात्र विद्यार्थीसंख्या ३ हजार २८७ असताना प्रत्यक्ष प्रवेश ३ हजार ३१७ विद्यार्थ्यांचा झाला़ विशेष म्हणजे, ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य ६ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यात यश मिळविल्याचे समोर आले आहे़
१६ जूनपासून शाळा सुरू झाल्या़ परंंतु शाळा प्रारंभापूर्वी १४ व १५ जूनला विविध बाबींवर लक्ष देण्यात आले़ गाव-वार्डनिहाय ६ ते १४ वयोगटातील दाखलपात्र व शाळाबाह्य अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून शाळा व गावच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात आली़
शाळा वर्गखोल्या, परिसर, नामफलक, सूचना फलक, वर्ग फलक, पिण्याचे पाणी आदी स्वच्छ करण्यात आले़ शाळा दाखलपात्र व नियमित दाखल असलेल्या मुला-मुलींना शाळेत दाखल होण्याचे प्रयत्न करण्यात आले़
तालुक्यात जि़प़ शाळा मोठ्या प्रमाणात आहेत़ त्यात १७ केंद्रांतर्गत इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थीसंख्या ३ हजार २८७ होती़ कंधार केंद्रांतर्गत १८९ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला़
पानभोसी केंद्रांतर्गत १७५, बहाद्दरपुरा-१७९, शेकापूर-१४३, रूई-२३८, दिग्रस बु-२२४, कुरुळा-३१२, बोळका-१८८, बारूळ-२६६, कौठा-१५९, गोणार-२२५, मंगलसांगवी-१५१, चिखली-२००, शिराढोण-१९७, उस्माननगर-१३३ अशी विद्यार्थीसंख्या आहे़ फुलवळ केंद्रांतर्गत मात्र पहिलीत दाखलपात्र विद्यार्थीसंख्या १७३ असताना प्रत्यक्ष दाखल १९९ झाले़ तसेच आंबुलगा केंद्रात १४२ दाखलपात्र असताना १४५ दाखल झाले़ त्यामुळे एकूण ३ हजार ३१७ पहिलीत दाखल विद्यार्थीसंख्या झाली़
६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य वयानुरूप रूई केंद्रांतर्गत १ मुलगा, बारूळ केंद्रांतर्गत ४ मुले व एक मुलगी अशा ६ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यात आले़ एकूण प्रवेशदाखल विद्यार्थीसंख्या ३ हजार ३२३ झाली़ काहींनी जवळच्याच केंद्रांतर्गत शाळेत प्रवेश घेतला़ काही आपल्या नातेवाईक यांच्याकडे शिक्षणासाठीही आले़ (वार्ताहर)
बहाद्दरपुरा केंद्रांतर्गत शाळेत पहिलीत ८६ मुले दाखल झाली़ परंतु मुली ९३ दाखल झाल्या़ शेकापूर केंद्रांतर्गत ७१ मुले व ७२ मुली, रूई ११८ मुले व ११९ मुली, बोळका-९१ मुले व ९७ मुली, गोणार १०७ मुले व ११८ मुली, मंगलसांगवी ६७ मुले व ८४ मुली व उस्माननगर केंद्रांतर्गत ५७ मुले व ७६ मुलींचा प्रवेश झाला़ पहिलीत १७३५ मुले व १५८२ मुलींचा प्रवेश झाला़

Web Title: 3 thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.