सणासुदीच्या तोंडावर ३ हजार क्विंटल साखरेची आवक

By Admin | Updated: August 22, 2014 00:58 IST2014-08-22T00:53:37+5:302014-08-22T00:58:30+5:30

उस्मानाबाद : मागील काही महिन्यापासून रेशन दुकानावरुन गायब झालेली साखर आता पुन्हा आली आहे. अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारंकाचा साखरेपुरता सनासुदीचा काळा गोड होणार आहे.

3 thousand quintals of sugar in the face of festive season | सणासुदीच्या तोंडावर ३ हजार क्विंटल साखरेची आवक

सणासुदीच्या तोंडावर ३ हजार क्विंटल साखरेची आवक



उस्मानाबाद : मागील काही महिन्यापासून रेशन दुकानावरुन गायब झालेली साखर आता पुन्हा आली आहे. अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारंकाचा साखरेपुरता सनासुदीचा काळा गोड होणार आहे. जिल्ह्यात नव्याने ३ हजार ६१८ क्टिवंल साखर प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सरकारी गोदामापर्यंत साखर पोंहचविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात नोव्हेेंबर २०१३ पासून रेशन दुकानावर साखर नव्हती त्यामुळे साखरेचे वितरण झाले नव्हते. राज्यात साखर महासंघाने साखरेचा पुरवठा करण्यासाठी दर वाढवून मागितल्याने साखर मिळाली नव्हती. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार शिधापत्रिका धारकांना साखर ेपासून वंचित रहावे लागले होते. शासनाने बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साखर उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजची मदत मदत घेतली आहे. स्टॉक एक्स्चव्दारे साखर आॅनलाईपुरवठा करण्यासाठी निविदा मागवुन घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात जुलै महिन्यांसाठी २ हजार ७३५ क्विटंल साखर नियतंन मंजुर झाले होते. जुलै महिन्यासाठी उस्मानाबाद तालुक्यासाठी ५३५ क्विंटल साखरेचे नियतन मंजुर झाले आहे. , तुळजापूर ५००, उमरगा ४००, लोहारा २००, कळंब ३००, भूम २५० , परंडा ३०० तर वाशी तालुक्यासाठी २५० असे जुलै महिन्यांसाठी एकुण २ हजार ७३५ क्टिवंल नियतन मंजूर झाले आहे. आॅगस्ट महिन्यासाठी ३ हजार ६१८ क्विंटल साखर प्राप्त झाल्याची माहिती पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

तालुकेमंजूर नियतन
उस्मानाबाद७५०
तुळजापूर७००
उमरगा५००
लोहारा३००
कळंब३००
भुम४००
परंडा३६८
वाशी३००
एकूण३६१८
(आकडे क्विंटलमध्ये)

Web Title: 3 thousand quintals of sugar in the face of festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.