३ हजार क्विंटल धान्य गायब

By Admin | Updated: August 9, 2014 00:29 IST2014-08-09T00:05:24+5:302014-08-09T00:29:46+5:30

पुन्हा एकदा जिंतूर तालुक्यात धान्य घोटाळा समोर आला आहे.

3 thousand quintals of grains disappeared | ३ हजार क्विंटल धान्य गायब

३ हजार क्विंटल धान्य गायब

विजय चोरडिया जिंतूर
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिल्लक धान्य कोटा सर्वसामान्य नागरिकांना वाटण्याऐवजी स्वस्तधान्य दुकानदार, पुरवठा विभाग व धान्य दलालांच्या साखळीने सुमारे ३ हजार क्विंटल धान्य काळ्या बाजारात गेल्याचे समजते. यामुळे पुन्हा एकदा जिंतूर तालुक्यात धान्य घोटाळा समोर आला आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मार्च ते जुलै या महिन्यात शिल्लक धान्य कोटा देण्यात आला. मार्च ते जुलै या महिन्यात प्रति कार्डावर सरासरी २५ क्विंटल धान्य देण्यात आले. परंतु, नियमाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात धान्य देणे गरजेचे आहे. लोकसंख्या व कार्ड संख्या यांच्या सरासरीवर सुमारे ३ हजार क्विंटल धान्याचा शिल्लक कोटा जिंतूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये १५०० क्विंटल गहू व १५०० क्विंटल तांदूळ याचा समावेश होता. काही लाभार्थ्यांना या पाच महिन्यात धान्य मिळाले नव्हते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बरेच लाभार्थी वंचित राहिले होते. त्यांचा शिल्लक असलेला धान्य कोटा ग्रामीण भागापर्यंत पोहचण्याऐवजी दलालाच्या साखळीने हा धान्य कोटा स्वस्तधान्य दुकानदारांशी हाताशी धरुन खरेदी केला. विशेष म्हणजे दलालांच्या साखळीने स्वस्तधान्य दुकानदारांना बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देऊन हा माल खरेदी केल्याने दुकानदारांनाही मोठा आर्थिक लाभ झाला. मागील महिन्यात रमजान हा सण असताना व गोदामात धान्य उपलब्ध असतानाही उशिराने धान्य वाटप करुन काळ्या बाजारात धान्य विक्रीस पुरवठा विभागाने हातभार लावला आहे.
एकाच दिवसात पाचशे क्विंटल धान्य गायब
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिल्लक धान्य कोट्यातील ७ आॅगस्ट रोजी ३५० क्विंटल गहू व २२५ क्विंटल तांदूळ गोदामातून उचलण्यात आला. त्यापैकी केवळ २५ क्विंटल धान्यच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्याची माहिती हाती आली आहे. तसेच २५ ते ३१ जुलै दरम्यान ८०० क्विंटल गहू व ९०० क्विंटल तांदळाची उचल करण्यात आली. यातील बहुतांश माल दलालाने गोदामातच खरेदीे करुन परस्पर लांबविला.

Web Title: 3 thousand quintals of grains disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.