शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:34 IST

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिकशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. येथील शीतगृहात २० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे, दिवसेंदिवस या ठिकाणी शवविच्छेदनाचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी २ हजार ४८० तर गतवर्षी २ हजार ५०० तर यंदा हा आकडा आतापर्यंत २५०० वर पोहोचला आहे. आगामी दहा दिवसांत हा आकडा २ हजार ६०० वर पोहोचेल,असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले. 

दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले. त्यामुळे घाटी रुग्णालयावर शवविच्छेदनाचा किती भार आहे, हे स्पष्ट होते. घाटीतील शवविच्छेदनगृहात एकावेळी दोन ते तीन डॉक्टर कार्यरत असतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदन होतात.  मेडिकोलीगल केसेस आणि अन्य कारणांमुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तीनशेवर शवविच्छेदनजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयात वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली.

...असा आहे ताणघाटीत शवविच्छेदनासाठी ७ वरिष्ठ डॉक्टर, तर ४ ज्युनिअर डॉक्टर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे आणि शवविच्छेदनाबरोबर न्यायालयात साक्ष देणे, शवविच्छेदन अहवाल पूर्ण करणे, पोलिसांच्या शंकांना उत्तरे देणे अशी अन्य जबाबदारीही डॉक्टरांना पार पाडावी लागत आहे. १ हजार शवविच्छेदनासाठी सध्याचे हे डॉक्टर्स पुरेसे आहे; परंतु प्रत्यक्षात अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. प्रत्येक ५०० शवविच्छेदनासाठी २ पोस्ट वाढल्या पाहिजे. येथील कामाचे स्वरूप पाहता ६ डॉक्टरांची आवश्यकता आहे,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या कारणांसाठी होते शवविच्छेदन१. विविध अपघाती मृत्यू.२. मारहाण, खून अशा गुन्हेगारी घटनांतील मृत्यू.३. विष प्राशन, अन्नातून विषबाधेतून मृत्यू.४. गळफास आणि आत्महत्या प्रकरणे.५. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप.६. शंकास्पद मृत्यूसह अन्य काही कारणे.७. वीज पडणे, पूर अशा नैसर्गिक आपत्कालीन घटनांतील मृत्यू.

विम्यासाठी शवविच्छेदन गरजेचेआपत्कालीन मृत्यू, गुन्हेगारी घटनेतील मृत्यू, अपघाती मृत्यू,आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यक ठरतो. आजारपणामुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदनाची गरज नसते. विम्याच्या क्लेमसाठी शवविच्छेदन आवश्यक आहे.-अ‍ॅड. अंगद कानडे-भाटसावंगीकर

...तर शवविच्छेदन टाळता येतेज्या प्रकरणात मृत्यूचे कारण डॉक्टरांना पूर्ण माहिती आहे आणि पोलिसांना ते मान्य असेल, तर शवविच्छेदन टाळता येते; परंतु याचे प्रमाण कमी आहे.‘एमएलसी’ नोंद झाली असेल, संशयास्पद मृत्यू झालेला असेल, मृत्यूचे कारण सांगता येत नसेल तर अशावेळी शवविच्छेदन आवश्यक ठरते.- डॉ. के. यू. झिने, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद