शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:17 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्तांचा निर्णय : कडक उन्हाळ्यात नागरिकांची भटकंती थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे. ज्या वॉर्डांना पूर्वी सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांना आता चौथ्या दिवशीच पाणी मिळणार आहे. अनेक वॉर्डांना दोन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. आता त्यांना एक दिवस कळ सहन करावी लागणार आहे.मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ‘झोपा काढा’आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातच अंथरूण लावले होते. रात्री ९ वाजता प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना ठणकावले की, रात्रभर बसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करून वेळापत्रक बुधवारी माझ्याकडे आणावे.तीन दिवसांआड प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालेच पाहिजे, असे नियोजन असावे, अशी सूचना त्यांनी केली. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहल यांनी वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. त्यांनी या नवीन वेळापत्रकाला क्षणार्धात मंजुरीही दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी तिसºया दिवशीचे टप्पे संपविण्यात येतील. शुक्रवारपासून परत शहरात पाण्याचा पहिला टप्पा सुरू होईल. ११ मेपासून संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल.कोणाला फायदा होणारगुलमंडी, राजाबाजार, शहागंज, लोटाकारंजा, औरंगपुरा, किराडपुरा, बारुदगरनाला, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी, बारी कॉलनी, जकात नाका, बायजीपुरा, रोशनगेट, रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, जाधववाडी, सुरेवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, भोईवाडा, नागेश्वरवाडी, समर्थनगर आदी वॉर्डांना चौथ्या दिवशी पाणी मिळणार आहे.दोन दिवसांआड पाणी द्यामाजी महापौरांसह युतीच्या नगरसेवकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले ही आमच्यासाठी खूप भूषणावह बाब नाही. प्रशासनाच्या असंख्य चुकांमुळे ही वेळ आली आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाणी मनपाकडे जमा होते. शहराला दररोज २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. मनपाकडे आणखी ५० एमएलडी पाणी अतिरिक्त राहते. दोन दिवसांआड पाणी देणे मनपाला सहज शक्य आहे. तीन दिवसाआड पाणी देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवसाआड पाणी द्यायला हवे. तीन दिवसाआड पाणी प्रशासन देणार असेल तर ४०५ एमएलडी पाणी जमा होणार आहे. गरजेपेक्षा दुप्पट पाणी शहरात राहील. आता टाक्या पूर्ण क्षमतेने भरून पाणीपुरवठा करायला हवा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.क ाँग्रेसचेही व्यापक आंदोलनउन्हाळा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने महापालिकेसमोर व्यापक आंदोलन केले होते. किराडपुरा आणि परिसरातील पाच ते सहा वॉर्डांना पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते.काँग्रेसने मनपाकडे तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. प्रशासनानेही लेखी स्वरुपात तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई