जलयुक्त लातूरसाठी जमले ३ कोटी ५० लाख

By Admin | Updated: April 16, 2016 23:43 IST2016-04-16T23:36:24+5:302016-04-16T23:43:48+5:30

लातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,

3 crore 50 lakhs collected for Jalit Latur | जलयुक्त लातूरसाठी जमले ३ कोटी ५० लाख

जलयुक्त लातूरसाठी जमले ३ कोटी ५० लाख

आर्ट आॅफ लिव्हिंगचा पुढाकार : विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, उद्योजकांचा हातभार
लातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,व्यापारी महासंघ व अनेक दानशुर व्यक्ती सरसावल्या आहेत़ मदतीचा ओघ दिवसागणिक वाढत आहे सर्वसामान्य नागरिकापासून चहावाल्यासह विद्यार्थीही मदतीसाठी सरसावले असून, या कामासाठी विविध सामाजिक संस्थांकडून ३ कोटी ५० लाखांचा निधी संकलित झाला आहे़ ३१ मे पर्यंत सदरील १८ किमी चे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्या दृष्टीने या कामाला गती देण्यात आली आहे़
साई-नागझरी, कारसा, पोहरेगाव याठिकाणी नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम ८ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले आहे़ हे काम पूर्णपणे शासनाच्या मदतीशिवाय आर्ट आॅफ लिव्हींग, जनकल्याण समिती, इंडीयन मेडिकल असोसिएशन, व्यापारी महासंघ, शैक्षणिक संस्था यांच्यासह हॉटेल चालक,विद्यार्थ्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे़ १८ किमी लांब, ८० मिटर रुंद, ३ मिटर खोल या प्रमाणात सुरु असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाला भरभरून मदत देण्याचे काम सुरु झाले आहे़ या कामासाठी ७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित असून, सर्व कामे लोकसहभागातूनच पूर्ण करण्याचे नियोजन सुरु असल्याने या कामासाठी आर्ट आॅफ लिव्हींग तर्फे १ कोटी, इंडियन मेडीकल असोसिएशन तर्फे ५१ लाख, जलकल्याण समितीतर्फे ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यासह दयानंद शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर विद्यालय, छत्रपती शिक्षण संस्था, महाराष्ट्र बायो फर्टीलायझर्स, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सक्रीयपणे सहभाग दर्शविला आहे़
८ ते ९ एप्रिल रोजी सुरु करण्यात आलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे मे अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याने ५० जेसीबी वाढवून या कामाला गती दिली जाणार आहे़ जलयुक्त लातूर अन् सर्वांसाठी पाणी ही लोकचळवळ गतीमान करण्यासाठी डॉ़अशोक कुकडे, अ‍ॅड़त्र्यंबकदास झंवर, मनोहर गोमारे, बी़बी़ठोंबरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असून, या कामला गती देण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हींगचे मकरंद जाधव व महादेव गोमारे हे परिश्रम घेत आहेत़ या कामासाठी आतापर्यंत ६० लाखांचा खर्च झाला आहे़ कुठल्याही शासकीय मदतीविना लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यात येत असल्याने ही चळवळ गतीमान होणार असल्याचे मकरंद जाधव म्हणाले़

Web Title: 3 crore 50 lakhs collected for Jalit Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.