गणवेशासाठी २.९९ कोटी मंजूर
By Admin | Updated: July 15, 2017 00:13 IST2017-07-15T00:12:11+5:302017-07-15T00:13:20+5:30
हिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी २ कोटी ९९ लक्ष १७ हजार ६०० रूपये निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.

गणवेशासाठी २.९९ कोटी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी २ कोटी ९९ लक्ष १७ हजार ६०० रूपये निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. एकूण ७४ हजार ७९४ शालेय गणवेशाची रक्कम विद्यार्थी-पालकाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
सदर निधी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. गणवेश योजनेतील लाभार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिल्या होत्या. परंतु ७४ हजार ७९४ पैकी केवळ २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची माहिती गुगलवर फॉर्मवर भरण्यात आली. त्यामुळे उर्वरित ७१ हजार ४८२ विद्यार्थ्यांची माहिती अजूनही अप्राप्त आहे. ज्यांचे बँकखाते आहेत, त्यानांच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ सर्व शिक्षाकडे भरून देणे अनिवार्य आहे. याबाबत वेळोवेळी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी आवाहनही केले होते. मात्र गशिअ व मुख्याध्यापकांकडून सदर माहिती भरण्यास दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या गणवेश योजनेची माहिती भरण्यासाठी सर्व शिक्षाने गुगल फॉर्म तयार केला आहे. मात्र सदर गुगलफॉर्मवर केवळ २५१८ जणांनी माहिती भरली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची अद्याप माहिती अप्राप्तच असल्याचे सर्व शिक्षा विभागाकडून सांगण्यात आले.