‘कोम्बिंग आॅपरेशन’मध्ये २९ गजाआड
By Admin | Updated: May 25, 2015 00:29 IST2015-05-24T23:51:50+5:302015-05-25T00:29:01+5:30
बीड: केज तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी कोम्बिंग आॅपरेशन राबवून २९ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

‘कोम्बिंग आॅपरेशन’मध्ये २९ गजाआड
बीड: केज तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी कोम्बिंग आॅपरेशन राबवून २९ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मांजरसुंबा घाटातील दरोड्याच्या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या ७ रेकॉर्डवरील गुन्हेगार मिळाल्याने त्या गुन्हेगाराविरुद्ध तसेच १९ संशयितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
दोन आरोपी नेकनूर महामार्गावरील चोऱ्यामध्ये निष्पन्न झाल्याने नेकनूर पोलिसांकडे तपासकामी देण्यात आले आहे. तसेच वाहन चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गावठी हातभट्टीची दारु जप्त करून एका विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अधीक्षक अनिल पारसकर, अपर पोलीस अधीक्षक माधव कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सी.डी. शेवगण, सपोनि देशपांडे, पोउपनि कांबळे, सपोनि उबाळे, भारत राऊत, महमंद सलीम, राठोड, आमटे, जोगदंड, मिसाळ, डोंगरे, गोले, औसेकर, चव्हाण, वडमारे, बिक्कड, भाकरे, केंद्रे, गायसमुद्रे, क्षीरसागर, जगताप, औटे, जाधवर, वाघ, सोनवणे, रेडेकर, शिंदे, उबाळे, नाईक, मस्के, पठाण, ढेपे यांनी केली. (प्रतिनिधी)