शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या २९ सिटीबस; शाळेच्या वेळेनुसार सुरु आहे बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:05 IST

विविध भागांतील शाळा, महाविद्यालये असलेल्या मार्गांवर त्यांच्या वेळेनुसार या बसेस सोडल्या जात आहेत.

ठळक मुद्दे शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने २९ सिटीबस सुरू केल्या आहेत.

- राजेश भिसे 

औरंगाबाद : शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने २९ सिटीबस सुरू केल्या आहेत. विविध भागांतील शाळा, महाविद्यालये असलेल्या मार्गांवर त्यांच्या वेळेनुसार या बसेस सोडल्या जात आहेत. शहरातील मराठी, इंग्रजी व इतर माध्यमांच्या विविध शाळा व्यवस्थापनांशी संपर्क साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रदूषण, वाहतूककोंडी आदींवर उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतुकीला शासनस्तरावरून प्रोत्साहन दिले जाते. याचाच एक भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी एसटी महामंडळाची सिटीबस सेवा सुरू आहे. शहरात एसटी महामंडळाच्या १८ जूनपर्यंत १८ बसेस सुरू होत्या. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने खास विद्यार्थ्यांसाठी ११ बसेस वाढविण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या बसेस सकाळी ७, दुपारी १२, सायंकाळी ५ ते ५.३० यादरम्यान सिटीबस सोडण्यात येत आहेत. शहरातील बससेवा सुरूअसलेल्या विविध मार्गांवर जवळपास ३५ शाळा, महाविद्यालये आहेत, त्यामुळे या सेवेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यादृष्टीने सिडको आगाराच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. गतवर्षी जुलै महिन्यात २३७, आॅगस्टमध्ये ३०७, सप्टेंबरमध्ये २२२ पासेस वितरित करण्यात आले होते. यंदा जाणीवपूर्वक प्रयत्न केले जणार असून, किमान एक हजार पासेस वितरित करण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर शाळेतच मिळणार विद्यार्थ्यांना पाससिडको एसटी आगारातील अधिकाºयांनी विविध शाळांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची यादी मागवली आहे. शाळेतील किमान शंभर विद्यार्थी एसटीचा पास घेणार असतील तर एसटी महामंडळाचा कर्मचारी संबंधित शाळेत जाऊन पास तयार करून देईल, असे सूत्रांनी सांगितले. 

शाळा व्यवस्थापकांनी संपर्क साधावाआतापर्यंत औरंगपुरा भागात ७०० अर्ज वितरित करण्यात आले आहेत, तर सिडको आगारातून २५० पासेस विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. आगामी पंधरा दिवसांत आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शाळा व्यवस्थापनाने संपर्क साधल्यास त्यांना शाळेतच पासेस उपलब्ध करून देण्यात येतील.- पी.पी. देशमुख, आगार प्रमुख, सिडको बसस्थानक, औरंगाबाद 

टॅग्स :Aurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकSchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक