दुष्काळात २८ हजार नवी कामे !
By Admin | Updated: December 1, 2014 00:50 IST2014-12-01T00:39:51+5:302014-12-01T00:50:34+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात कमी पर्जन्य झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे़ त्या अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सेल्फवर २८ हजार दुष्काळी कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे़

दुष्काळात २८ हजार नवी कामे !
लातूर : लातूर जिल्ह्यात कमी पर्जन्य झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे़ त्या अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सेल्फवर २८ हजार दुष्काळी कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे़ जिल्ह्यातील ३ लाख लोकांना रोजगार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़
मागील दोन वर्षांपासून कमी पाऊस होत आहे. शेती पेराही घटला आहे़ जो पीक पेरा झाला तो अवकाळी पावसाने व गारपीटीने शेतकरी पार कोलमडून गेला आहे़ नद्या नाले कोरडेठाक पडले आहेत़ पाणीटंचाई व जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ परिणामी शेती उत्पादनातही मोठी घट झाली आहे़ यासर्व परिस्थितीचे अवलोकन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले असून, जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ९ आॅक्टोबर २०१३ केंद सराकाच्या योजनेनुसार जिल्ह्यात २८ हजार कामे सेल्फवर आहेत़ या अंतर्गत जलसंधारणाच्या कामावर विशेष भर दिला जाणार आहे़ यामध्ये साखळी बांधारा कामे, सलग समतल चर कामे, नाला सरळीकरण, नाला खोलीकरण, जल पनर्रभरण, विहीर खोलीकरण, विहिरीतील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरणाची विविध कामे, इंधन विहिरी घेणे, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, शेतीतील धुरे व्यवस्थित करणे, कुकुट पालन शेड, शेळी पालन शेड, पाणलोटीचे कामे, वृक्ष लागवडीचे कामे, रोपवाटीका , वृक्ष संगोपण, गांडूळ खत निर्मिती यासोबतच रस्ते मजबुतीकरण, अशा प्रकारची विविध २८ हजार कामे सेल्फवर आहेत़ या २८ हजार कामाअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख मजुरांच्या हाताला कामे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ७८७ ग्रामपंचायतींना या रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे देऊन रोेजगाराची उपलब्धी ग्रमापंचायती अंतर्गत केली जाणार आहे.
‘मागेल त्याला काम’ दिले जाईल, असे मुख्यकार्यकरी आधिकारी महेश मेघमाळे यांनी समन्वय बैठकीत सांगितले. तसेच या नियोजनाची अंमलबजावणी तात्काळ सूरु करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी विभाग प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या़
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, जि़प़ च्या समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, रेणापूर पंचायत सममिती सभापती प्रदीप राठोड, जळकोट पंचायत समितीच्या सभापती सोजरबाई कांबळे, चाकूरचे सभापती करिमसाब गुळवे, यांच्यासह जि़प़चे सर्व गटविकास अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख, उप अभियांता, पशुसवर्धन अधिकारी, आरोग्य अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आदींची उपस्थिती होती़(प्रतिनिधी)