शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राज्यात २८ हजार ३५९ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 06:01 IST

‘लोकमत’च्या राज्यभरातील हॅलो टीमने मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

औरंगाबाद : राज्यात शहरांना जे जमले नाही ते गावकऱ्यांनी करून दाखवले. राज्यातील एकूण ४३ हजार २५ गावांपैकी तब्बल २८ हजार ३५९ गावांनी ‘कोरोना’ला वेशीच्या आत येऊच दिले नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली असताना या गावांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. सर्वाधिक कोरोनामुक्त गावे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आहेत. ‘लोकमत’च्या राज्यभरातील हॅलो टीमने मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.>कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनामुक्त गावे?कोरोनाचा अद्याप शिरकाव न झालेली १,००० पेक्षा जास्त गावे असलेल्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, अमरावती, नांदेड, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, बीड, रत्नागिरी, बुलडाणा आणि जळगाव यांचा क्रमांक लागतो.>या गावांनी काय केले?परजिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतरच गावात प्रवेश.वेशीबाहेर सॅनिटायझर आणि हात धुण्यासाठी व्यवस्था.बाहेरगावाहून भाजीपाल्यासह इतर वस्तू घेऊन येण्यास प्रतिबंध.बाहेरगावातील नातेवाईकांसह सर्वांनाच गावबंदी. काही कारणास्तव बाहेरील व्यक्ती आलीच, तर तिच्या सर्व वस्तू निर्जंतुक आणि सॅनिटाईझ करून गावात प्रवेश.अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच गावाबाहेर जाण्यास परवानगी. बियाणे-खत खरेदीसाठी चार-पाच जणांचा ग्रुप सर्व खबरदारीसह शहराच्या ठिकाणी जाणार आणि आल्यानंतर अंघोळीसह कपडे धुणे आदी काळजी घेणार. काही गावांनी गावातच केली व्यवस्था.अतिजोखमीचे रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला आदींचे सर्वेक्षण करून आरोग्य विभागामार्फत गावातच उपचार.अंगणवाडी सेविका, दक्षता समिती आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर निगराणी.प्रशासनाच्या सूचनांचे पालन. गर्दी करण्यास बंदी. आठवडी बाजार बंद. सौम्य लक्षणे आढळताच होम-क्वारंटाईन.वेळोवेळी गावात जंतुनाशक फवारणी. स्वच्छता मोहीम.गावात उत्पादित दूध-भाजीपाल्याचे गावातच वितरण. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस