शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील २८ लाख शेतकरी अद्याप मदतीविना

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वैयक्तिक मदत जमा करण्याचे काम प्रशासनातर्फे महिनाभरापासून सुरू आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वैयक्तिक मदत जमा करण्याचे काम प्रशासनातर्फे महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरच ही मदत जमा होऊ शकली. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ५८१ कोटी रुपये जमा झाले आहेत. विभागात एकूण ४० लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, त्यासाठी एकूण २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील ३९ लाख ७७ हजार शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. महिनाभरापूर्वी शासनाने पहिल्या टप्प्यात ८४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी पुन्हा आणखी ८४५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, अजून पहिल्या टप्प्यातील मदतच पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ८४५ कोटी रुपयांपैकी अवघे ५८१ कोटी रुपयेच वाटप झाले आहेत. १२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा झाली आहे.विभागात एकूण ४७ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली होती. या सर्व क्षेत्राला शासनाचीही मदत मिळणार आहे. वरीलपैकी २८ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्र हे अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे आहे. या सर्व क्षेत्राला पूर्ण मदत मिळणार आहे. उर्वरित १९ लाख २६ हजार हेक्टर हे बहुभूधारक शेतकऱ्यांचे आहे. त्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जात आहे. मदत वाटपाची आतापर्यंतची परिस्थितीजिल्हागावेशेतकरीरक्कमऔरंगाबाद७५९१ लाख ९३ हजार१०१ कोटीजालना२५७१ लाख ५५ हजार६९ कोटीपरभणी३९६९५ हजार४८ कोटीहिंगोली३७४९६ हजार४९ कोटीनांदेड४३२१ लाख ६२ हजार६८ कोटीबीड६५१२ लाख २९ हजार१०१ कोटीलातूर५२२१ लाख ४६ हजार७८ कोटीउस्मानाबाद३३३१ लाख ६० हजार६३ कोटीएकूण३७२४१२ लाख ३७ हजार५८१ कोटी