मराठवाड्यातील २८ लाख शेतकरी अद्याप मदतीविना

By Admin | Updated: February 10, 2015 00:33 IST2015-02-10T00:23:55+5:302015-02-10T00:33:43+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वैयक्तिक मदत जमा करण्याचे काम प्रशासनातर्फे महिनाभरापासून सुरू आहे.

28 lakh farmers of Marathwada still do not want to help | मराठवाड्यातील २८ लाख शेतकरी अद्याप मदतीविना

मराठवाड्यातील २८ लाख शेतकरी अद्याप मदतीविना


औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वैयक्तिक मदत जमा करण्याचे काम प्रशासनातर्फे महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरच ही मदत जमा होऊ शकली. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ५८१ कोटी रुपये जमा झाले आहेत. विभागात एकूण ४० लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, त्यासाठी एकूण २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील ३९ लाख ७७ हजार शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. महिनाभरापूर्वी शासनाने पहिल्या टप्प्यात ८४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी पुन्हा आणखी ८४५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, अजून पहिल्या टप्प्यातील मदतच पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ८४५ कोटी रुपयांपैकी अवघे ५८१ कोटी रुपयेच वाटप झाले आहेत. १२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा झाली आहे.
विभागात एकूण ४७ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली होती. या सर्व क्षेत्राला शासनाचीही मदत मिळणार आहे. वरीलपैकी २८ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्र हे अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे आहे. या सर्व क्षेत्राला पूर्ण मदत मिळणार आहे. उर्वरित १९ लाख २६ हजार हेक्टर हे बहुभूधारक शेतकऱ्यांचे आहे. त्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जात आहे.

मदत वाटपाची आतापर्यंतची परिस्थिती
जिल्हागावेशेतकरीरक्कम
औरंगाबाद७५९१ लाख ९३ हजार१०१ कोटी
जालना२५७१ लाख ५५ हजार६९ कोटी
परभणी३९६९५ हजार४८ कोटी
हिंगोली३७४९६ हजार४९ कोटी
नांदेड४३२१ लाख ६२ हजार६८ कोटी
बीड६५१२ लाख २९ हजार१०१ कोटी
लातूर५२२१ लाख ४६ हजार७८ कोटी
उस्मानाबाद३३३१ लाख ६० हजार६३ कोटी
एकूण३७२४१२ लाख ३७ हजार५८१ कोटी

Web Title: 28 lakh farmers of Marathwada still do not want to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.