सुखना प्रकल्पात २८ पक्षी प्रजाती
By Admin | Updated: December 22, 2014 00:09 IST2014-12-22T00:09:17+5:302014-12-22T00:09:17+5:30
औरंगाबाद : पर्यावरणावर प्रदूषणाचा परिणाम आणि पक्ष्यांची काय अवस्था याविषयी वन विभागाने रविवारी पक्षी गणना केली, तेव्हा सुखना प्रकल्पात २८ पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आढळून आल्या.

सुखना प्रकल्पात २८ पक्षी प्रजाती
औरंगाबाद : पर्यावरणावर प्रदूषणाचा परिणाम आणि पक्ष्यांची काय अवस्था याविषयी वन विभागाने रविवारी पक्षी गणना केली, तेव्हा सुखना प्रकल्पात २८ पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आढळून आल्या.
पक्षी सकाळीच एकत्र आढळून येतात. म्हणून भल्या पहाटे पक्षी निरीक्षणाचा ताफा निघाला. त्यांनी जंगलात पक्ष्यांची गणना सुरू केली. त्यावेळी वेडा राघू, पाणकोंबडी, करकोचे, रोहित, स्पूनबिल, खंड्या, चंडोल, टिटवी, नाम्या व पाच प्रकारची बदकेही निदर्शनास आली.
पक्षीमित्र किशोर पाठक, निखिल जहागीरदार, समीर खान, उपवन संरक्षक ए.डी. भोसले, वनक्षेत्रपाल रत्नाकर नागापूरकर, व्ही.एल. गायकवाड, यू.एम. फारुकी आदींनी सुखना प्रकल्पाची पाहणी केली. दुष्काळी अवस्थेत प्रकल्पात २५ ते ३० टक्केच जलसाठा असून, त्या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबाद- जालना जिल्ह्यांतील १४ ठिकाणांची माहिती वन विभागाच्या मुख्यालयाच्या हाती आली असून, सविस्तर वृत्तांत दोन दिवसांनंतर मिळणार आहे. वेताळवाडी, धिंगापूर, जंगली तलाव, घाणेवाडी, सुखना प्रकल्प, अंधारी प्रकल्प, सांजूळ तलाव, गडदगड प्रकल्प, टेंभापुरी धरण, पिशोर, वडाळी इ. प्रकल्पांसह औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत गणना करण्यात आली.
अजून किती ठिकाणी पक्षी दिसतात, त्यांचे राहणीमान, आहारविहार पद्धती आदीच्या अभ्यासासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून, ११ जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात गणना होणार आहे. पक्षीमित्र, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात होते.