७५२ शाळांत २७,३५२ विद्यार्थी हजर; सर्व जण ठणठणीत

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:01+5:302020-12-04T04:12:01+5:30

योगेश पायघन औरंगाबाद : जिल्ह्यात नववी ते बारावीच्या १,१५८ शाळांपैकी २३ नोव्हेंबरला ग्रामीण भागात सुरू झालेल्या ४०६ शाळा, महाविद्यालयांत ...

27,352 students in 752 schools; Everyone is cool | ७५२ शाळांत २७,३५२ विद्यार्थी हजर; सर्व जण ठणठणीत

७५२ शाळांत २७,३५२ विद्यार्थी हजर; सर्व जण ठणठणीत

योगेश पायघन

औरंगाबाद : जिल्ह्यात नववी ते बारावीच्या १,१५८ शाळांपैकी २३ नोव्हेंबरला ग्रामीण भागात सुरू झालेल्या ४०६ शाळा, महाविद्यालयांत १७ हजार २७५ विद्यार्थी हजर होते, तर २ डिसेंबरला हा आकडा वाढून ७५२ शाळांत २७ हजार ३५२ विद्यार्थी वर्गात उपस्थित राहिले. सुरक्षेच्या उपयायोजनांची योग्य अंमलबवजावणी झाल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत असताना सर्व विद्यार्थी ठणठणीत आहे.

जिल्ह्यात १,१५८ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यात २ लाख ६७ हजार ७१९ विद्यार्थी पटसंख्या आहे. त्यापैकी ग्रामीणमधील ७५२ शाळा सुरू झाल्या. त्या शाळांत २ डिसेंबरला २७ हजार ३५२ विद्यार्थी ९ ते १३ वीच्या वर्गात उपस्थित होते. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्याच्या विद्यार्थी संख्या दहा हजारांनी वाढली आहे.

या वर्गांना शिकवण्यासाठी ५,४७८ शिक्षक असून, त्यापैकी ५,३६१ शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झाली, तर रजेवर आणि आजारी, अशा ११७ शिक्षकांची तपासणी अद्याप बाकी आहे. यामधून ९२ शिक्षक पाॅझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिक्षकेतर ४,४९२ कर्मचाऱ्यांपैकी ४,३८४ कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यातून ३७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.

---

आठवड्यातील उपस्थिती

२७,३५२

विद्यार्थी

---

५,२६९

शिक्षक

---

४,३४७

कर्मचारी

---------

५,३६१

शिक्षकांची चाचणी

---

९२

पाॅझिटिव्ह

---

पालकांची संमती

सुरक्षिततेच्या सर्व उपयायोजनांचा वापर केल्याने एकाही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची कुठलीही घटना समोर आली नाही. पालकांची संमती वाढत असल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे.

----

कोट

---

सुरू झालेल्या शाळांत विद्यार्थी संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यातही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांकडून शाळा सुरू ठेवण्यासाठी आग्रह वाढतोय. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

-डाॅ. बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: 27,352 students in 752 schools; Everyone is cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.