शेतवस्तीतून २७ हजार रुपये लांबविले

By Admin | Updated: October 30, 2014 00:26 IST2014-10-30T00:12:09+5:302014-10-30T00:26:17+5:30

जालना : तालुक्यातील बापकळ शिवारातील गट नं. ८९ मध्ये शेत वस्तीतून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व इतर साहित्य मिळवून २६ हजार ५०० रूपयांचा ऐवज पळविला.

27,000 rupees have been withdrawn from the farm | शेतवस्तीतून २७ हजार रुपये लांबविले

शेतवस्तीतून २७ हजार रुपये लांबविले


जालना : तालुक्यातील बापकळ शिवारातील गट नं. ८९ मध्ये शेत वस्तीतून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व इतर साहित्य मिळवून २६ हजार ५०० रूपयांचा ऐवज पळविला. हा प्रकार २६ आॅक्टोबरच्या मध्यरात्री घडला.
मौजपुरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. शेत वस्तीवर राहणाऱ्या कुशीवर्ता खुशालराव शिंदे ही महिला अपंग व आजारी मुलासोबत झोपली होती. टीनपत्राच्या शेडमध्ये झोपली असताना गेल्या चार दिवसांपासून सतत पिण्याचे पाणी घेण्याचा बहाणा करून येणाऱ्या दोघांनी ही लुटमार केली.
हे दोघेही इसम २५ आॅक्टोबरच्या मध्यरात्री आले असता दोघांपैकी एकाने शिंदे यांना चाकूचा धाक दाखवून दुसऱ्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तोंडावर चापटांनी मारहाण केली. अंगावरील दागिने व कपाटातील दागिने काढून घेतले. याप्रकरणी जमादार मगर यांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सुरोसे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 27,000 rupees have been withdrawn from the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.