मराठवाड्यात २७ हजार जण होम क्वांरटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:16+5:302020-12-17T04:28:16+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात २७ हजार ४३ नागरिक सध्या होम क्वारंटाईन केल्याची माहिती विभागीय प्रशासनाने अहवालात दिली आहे. औरंगाबादमध्ये ६ ...

मराठवाड्यात २७ हजार जण होम क्वांरटाईन
औरंगाबाद : मराठवाड्यात २७ हजार ४३ नागरिक सध्या होम क्वारंटाईन केल्याची माहिती विभागीय प्रशासनाने अहवालात दिली आहे. औरंगाबादमध्ये ६ हजार ६४३, बीड- १८ हजार २०० तर हिंगोली- ७१९ नागरिक होम क्वारंटाईन आहेत. इतर जिल्ह्यात १०० ते ५०० दरम्यान नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
संस्थात्मक अलगीकरण वाढतेय
औरंगाबाद : मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले संस्थात्मक अलीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन) बंद होत असतानाच काही जिल्ह्यांत ते वाढू लागले आहे. चार महिन्यांपूर्वी १ लाख नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन होते. ते प्रमाण ६ डिसेंबर रोजी १ हजार ८ इतके होते. १३ डिसेंबर रोजी ४ हजार ८४१ नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन असल्याची नोंद झाली. याचा अर्थ ९९ टक्के इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन बंद होत आले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनचे प्रमाण वाढत आहे.