२७ दरवाजाद्वारे पाणी तळणीकडे

By Admin | Updated: March 19, 2015 23:56 IST2015-03-19T23:38:28+5:302015-03-19T23:56:33+5:30

तळणी : वझर सरकटे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी अडविले होते. तळणीकडे धिम्या गतीने पाण्याचा प्रवाह सुरु होता

27 Water flutter through the door | २७ दरवाजाद्वारे पाणी तळणीकडे

२७ दरवाजाद्वारे पाणी तळणीकडे


तळणी : वझर सरकटे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी अडविले होते. तळणीकडे धिम्या गतीने पाण्याचा प्रवाह सुरु होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी पाटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २७ दरवाजे काढून तळणी कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणी सोडण्यात आले.
खडक पूर्णा प्रकल्पातून दोन दिवसात १६.४१ क्युसेस विसर्गाने ४.२८ द.ल. घनमीटर पाणी सोडण्यात आले होते. मात्र, वझर सरक टे येथील शेतक ऱ्यांनी क ोल्हापुरी बंधाऱ्यांचे पूर्ण दरवाजे लावून पाणी अडविले होते. तळणीकडे पाण्याने धिम्या गतीने मार्गक्रमण सुरु केल्याने जवळपास चार ते पाच दिवस तळणीचा कोल्हापुरी ब्ांधारा भरण्यासाठी वेळ लागणार होता. याची दखल घेत प्उपविभागीय अभियंता एम.एस.शेख , मंठा शाखा अधिक ारी एम.ए. खवले यांच्या उपस्थितीत २७ दरवाजे काढून घेण्यात आले. २७ दरवाज़े क ाढल्याने प्रचंड वेगाने पाणी तळणीक डे सोडण्यात आले. यावेळी वझर येथील सरक टे सरपंच जगदीश सरक टे, वाघाळाचे सरपंच दत्तराव कांगणे, कैलास खंदारे, ज्ञानेश्वर राठोड, बद्री कांगणे, राजकुमार कांगणे, गणेश खंदारे, शरद खंदारे, नामदेव नागरे, राम खंदारे, अजय आघाव, विठ्ठल खंडागळे, बबन खंदारे यांच्यासह शेतक री उपस्थित होते.
याबाबत पाटबंधारे उपविभागाचे मंठा शाखा अधिकारी एम.ए. खवले यांना विचारले असता, परिसरातील शेतक ऱ्यांनी पाणी अडविले होते. त्यामुळे उपविभागीय अभियंता एम.एस.शेख यांच्या उपस्थितीत प्रत्येक ी एक असे एकूण २७ दरवाजे क ाढून घेतल्याने शुक्र वार पर्यंत तळणी येथील कोल्हापुरी बंधारा भरुन उस्वद-देवठाणा पर्यत पाणी पोहचेल, असे खवणे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 27 Water flutter through the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.